शिवचरित्रमाला - भाग ७९ - नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ

स्वराज्याला प्रारंभ केल्यापासून महाराजांचे वास्तव्य मुख्यत: राजगडावरच होते. राजगड हाच स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला करावा असे त्यांच्या मनात होते ,म्हणूनच राजगडाचा वापर राजधानी सारखाच सुरू झाला. (इ. १६४६ पासून) त्या वेळेपासूनच राजगडाच्या तीनही माचीआणि बालेकिल्ला बांधकामाने सजूलागल्या. सुवेळा संजीवनी आणि पद्मावती अशी या तीन माचींची नावे. एवढी उत्कृष्ट बांधकामे महाराष्ट्रातील कोणत्याही एकाच किल्ल्यावर सापडणार नाहीत. राजगड केवळ अजिंक्य होता. 

वास्तविक स्वराज्याचे राज्यकारभारातील 
वेगवेगळे भाग सपाट प्रदेशावरती असणे हे राजाच्या प्रजेच्या आणि राज्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने जेवढे सपाटीच्या शहरात सोईचे होतात तेवढे उंचउंच डोंगरमाथ्यावर होऊ शकत नाहीत. पण असे शहरात सपाटीवर राजधानी करणेक्रांतीच्या प्रारंभ काळात धोक्याचेही असते. शत्रू केव्हा झडप घालील आणि ऐन राजधानीलाच कधी धोका पोहोचेल याचा नेम नसतो. म्हणून उंच शिखरावर तटबंदीने अजिंक्य बनविलेल्याकिल्ल्यावर राजधानी असणे गरजेचेच असते. राजगडचे बांधकाम सुमारे १० वषेर्ं चालले होते. जगातील उत्कृष्ट अशा डोंगरी लष्करी किल्ल्यात राजगडाचा समावेश करावा लागेल. 

इ. स. १६४६ 
पासून ते आग्ऱ्याहून सुटकेपर्यंत स्वराज्याची राजधानी राजगड होती. अद्यापीही होतीच की पण मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान यांची स्वारी आली तेव्हा महाराजांच्या प्रत्ययास एक गोष्ट आली की मोगलांचे लष्कर राजगडाच्या पायथ्यापर्यंत घुसण्याचा प्रयत्न करीत आहे. 

रायकरण सिसोदिया 
दाऊतखान कुरेशी सर्फराजखान इत्यादी मोगली सरदार राजगडाच्या उत्तरेस असलेल्या मावळात म्हणजेच गुंजण मावळ आणि कानद मावळ या भागांत विध्वंसन करण्यासाठी मुसंड्या मारताहेत. या मोगली सरदारांनी प्रत्यक्ष राजगडावर हल्ले चढविले नाहीत. मोचेर् लावले नाहीत किंवा वेढा घालून बसण्याचेही प्रयत्न केले नाहीत. तशी एकही नोंद सापडत नाही. तरीही मोगली शत्रू राजधानीच्या पायथ्यापर्यंत येऊन जातो ही गोष्टही फार गंभीर होती.म्हणून महाराजांनी राजधानीचे ठिकाणच बदलावयाचा विचार सुरू केला. 

नवी राजधानी कुठे करायची म्हटले 
तरी ती डोंगरी किल्ल्यावरच करावी लागणार हे उघड होतं. जेव्हा कधी पुढे स्वराज्याचा सपाट प्रदेशावरतीही विस्तार होईल तेव्हा एखाद्या शहरांत राजधानी करणे थोडे सोईचे ठरेल. पण जोपर्यंत उत्तर पूर्व आणि दक्षिण या बाजूंना बादशाही अंमल अगदी लागून आहे तोपर्यंत डोंगरातून बाहेर येणे आणि राजधानी स्थापणे हे धाडसाचे आणि लष्करी जबाबदारी वाढविणारे ठरेल. 

म्हणून महाराजांनी 
राजधानीचा विचार नवीन केला. त्यांचे लक्ष रायगडावरच खिळले. कोकणच्या बाजूने समुदापर्यंत मराठी स्वराज्याचा विस्तार झालेला होता. रायगड उंच पर्वतावर असूनही विस्ताराने प्रचंड आणि संरक्षणाच्या दृष्टीने केवळ अजिंक्य होता. 

आणि महाराजांनी 
राजधानी करण्याच्या दृष्टीने रायगडावर बांधकामे सुरू केली. त्यांनी रायगड राजधानी केली. यात त्यांची युद्धनेता या दृष्टीने अधिकच ओळख चांगल्याप्रकारेइतिहासाला होते. 

रायगड सर्व 
बाजूंनी सह्यशिखरांनी गराडलेला आहे. एका इंग्रजाने या रायगडावर असा अभिप्राय व्यक्त केला आहे की , ' रायगडसारखा अजिंक्य किल्ला जगाच्या पाठीवर दुसरा नाही. दुसऱ्या एका इंग्रजाने रायगडाला त्नद्बड्ढह्मड्डद्यह्लश्ाह्म श्ाद्घ ह्लद्धद्ग श्वड्डह्यह्ल असे म्हटले आहे.हेन्री ऑक्झिंडेन ऑस्टीन युस्टीक इत्यादी अनेक पाश्चात्य मंडळींनीही रायगडचा डोंगरी दरारा आपापल्या शब्दांत लिहून ठेवला आहे. 

हिराजी इंदुलकर या नावाचाही एक 
उत्कृष्ट दुर्गवास्तुतज्ज्ञ महाराजांच्या हाताशी होता. महाराजांनी याच हिराजीला राजधानीच्या रुपाने रायगडची बांधकामे सांगितली. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता रायगडाच्या म्हणजेच राजधानीच्या बेलाग सुरक्षिततेचा. त्या दृष्टीने रायगड सजू लागला. रायगड किती बलाढ्य आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर खरे लक्षात येते. 

हळूहळू एकेक 
राज्यकारभाराचा विभाग राजगडावरून रायगडावर दाखल होऊ लागला. पुढे इ.१६७४ मध्ये महाराज प्रत्यक्ष सिंहासनादिश्वर छत्रपति झाले ते याच रायगडावर. त्यावेळी हिराजी इंदुलकरानी जी काही बांधकामे गडावर केली त्याची नोंद एका शिलालेखात कोरली. हाशिलालेख आजही रायगडावर श्रीजगदीश्वर मंदिराच्या बाहेर आहे. तेथेच देवळाच्या पायरीवर त्याने पुढील शब्द कोरले आहेत. 

सेवेचे ठाई तत्पर हिराजी इंदुलकर 

रायगडावर 
चढून जाण्याची वाट अरुंद आणि डोंगरकड्याच्या कडेकडेने वर जाते. त्यामुळे चढणाऱ्याला धडकीच भरते. वर चढत असताना डावीकडे खोल खोल दऱ्या आणि उजवीकडे सरळसरळ कडा. असे हे बांधकाम गडाच्या माथ्यापर्यंत करताना केवढे कष्ट पडले असतील ,याची कल्पनाही नेमकी येत नाही. 

अशा उंच गडावर चिरेंबदी दरवाजे 
बुरुज चोरवाटा आणि संरक्षक मोचेर् पाहिले की ,हिराजीने भीमाच्या खांद्यावर जणू चक्रव्यूहच रचला असे वाटते. त्याने एक सुंदर वास्तू एक बलाढ्य लष्करी वास्तू आणि तेवढीच मोलाची कला संस्कृती विविध शास्त्रे यांची रायगड 'ही सरस्वती नगरीही उभी केली. हिराजी इंदुलकर हा निष्णात लष्करी वास्तुतज्ज्ञ होता स्वत: महाराज.