शिवचरित्रमाला - भाग २५ - तुका म्हणे येथे... येऱ्या गबाळ्याचे काम नोहे

पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे लढले.तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत ते झुंजतच होते. पन्हाळ्यावरून निसटल्यापासून पावनखिंडीत पोहोचेपर्यंत ते सतत झपझप चालत होते. भर पावसांत. गडद अंधारात. पन्हाळ्याहून निघाले दि. १२ जुलैच्या रात्री सुमारे १० वाजता. अन् पावनखिंडीत पोहोचले १ जुलैच्या दुपारी सुमारे एक वाजता म्हणजे सतत १५ तासांची धाव चालू होती त्यांची.

तिथेच लढाई सुरू झाली. 
ती रात्री जवळजवळ सात-साडेसातपर्यंत. म्हणजे सतत सहा तास ते तलवारी हाती घेऊन झुंजत होते. सतत २२ तास शारीरिक श्रम. अविश्रांत. मृत्यूशी झुंज. ही शक्ती त्यांच्या आणि मावळ्यांच्या हातापायात आली कुठून यावेळी बाजीप्रभूंचं वय काय असावंइतिहासाला माहीत नाही. पण सात पुत्रांचा हा बाप निदान पन्नाशी उलटलेला शमीचा वृक्षच होता. त्यांना उद्दिष्टाचा गड गाठायचा होता. त्यांची निष्ठा रुदासारखी होती. 

अंगी निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचि फळ. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर हाच त्यांचा हट्ट होता. उद्दिष्ट साधेपर्यंत मरायला त्यांना सवडच नव्हती. तोफेआधी मरे न बाजी सांगा मृत्यूला!हा त्यांचा मृत्यूला निरोप होता. बाजी फुलाजी आणि असंख्य मावळे सहजसहज मेले. सूर्यमंडळ भेदून गेले. 

इथे एक गोष्ट आठवते. 
दुसऱ्या महायुद्धात खारकोन्हच्या जवळ रशियांत जर्मन आक्रमक फौजेलाअवघ्या बारा कामगारांनी असंच दीड दिवस झुंजून रोखून धरलं. शत्रूची मॉस्कोवर चाललेली धडक या बारा वेड्यांनी रोखून धरली. मॉस्कोकडून मदतीसाठी रशियन सेना येत होती. तीयेईपर्यंत हे बारा झुंजले. सारे मरण पावले. मदत आली. जर्मन हल्ला माघारी फिरला. अखेर रशियाचा जय झाला. हे बारा कामगार रशियाचे बारा तेजस्वी प्रेरक तारे ठरले आहेत आज. 

बाजीप्रभू देशपांडे यांचं खरं 
आडनाव प्रधान असं आहे. भोर शहराजवळ पाच किलोमीटरवर 'सिंद या नावाचं एक छोटं संुदर गाव आहे. तिथं बाजींचा भव्य वाडा होता. भोवती अंगण होतं. आज काहीही शिल्लक नाही. जिथं बाजी राहिले वावरले त्या वाड्याची ही अवस्था. त्यांच्या वाड्याच्या जागेत आज सार्वजनिक संडास बांधलेले आहेत. 

जाता जाता एक गोष्ट सांगतो. 
याच युद्धकाळात (इ. स. १६५९ ६० आपल्याला आठवतंय काशिवाजीराजे अफझलखानाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी जेव्हा राजगडावरून प्रतापगडांस आले तेव्हा असाच तुफानी पाऊस होता. (श्रावण वद्य प्रतिपदा दि. ११ जुलै १६५९ या दिवशी महाराज राजगडावरून जिजाऊसाहेबांची शेवटची भेट घेऊन निघाले. कुटुंबातील सर्वांनात्यांनी राजगडावरच ठेवले. जिजाऊसाहेबांची भेट घेताना त्यांची दोघांचीही मने किती गलबललीअसतील राणीसाहेब सईबाई यातर क्षयाने अत्यवस्थ होत्या. त्यांच्या भेटीतील मानसिक हलकल्लोळ कल्पनेने तरी आपण ओळखू शकतो का आपण शिवचित्र ओळखतो. शिवचरित्रही शक्य तेवढे जाणतो. पण हे पिळवटून काढणारे त्यांच्या जीवनातील क्षण आपल्याला समजूच शकत नाहीत. 

राणीसाहेबांची आणि त्यांची ही शेवटचीच 
भेट. यानंतर फक्त एक महिना आणि सव्वीस दिवसांनी सईबाईसाहेब राजगडावर मरण पावल्या. महाराज तेव्हा प्रतापगडावर होते. 

जिजाऊसाहेबांची ही भेट झाल्यानंतर 
महाराज अफझलवधानंतर ताबडतोब पुढच्या मोहिमेला गेले. मध्यंतरी अनेक लढाया आणि घटना घडल्या. मग महाराजांची आणि जिजाऊसाहेबांची भेटपुन्हा केव्हा घडली दि. १७ ऑगस्ट १६६० म्हणजेच एक वर्ष एक महिना आणि एक आठवडा मायलेकरांची भेट नाही. 

विशाळगडावरून महाराज 
राजगडला आले इतक्या दिवसांनी. महाराजांचा बाळ यावेळी सव्वातीन वर्षांचा झालेला होता. त्याला उचलून गळ्याशी घेताना महाराजांना काय वाटलंअसेल आहे का कुणी कवी कुणी कादंबरीकार कुणी चित्रकार कुठे आहेत हे आमचे प्रतिभावंत 

गेली 
दोन वर्षं (इ. १६५९ ते ६० दोन आघाडीवर दोन जबरदस्त शत्रू स्वराज्याला छळत होते. सिद्दी जौहर आणि शाहिस्तेखान. कधीकधी शत्रूच्या चुकांचा आपण अचूक फायदा घेत नाही. महाराज मात्र घेत असत. इथेच पाहा ना! शाहिस्तेखानाने पुण्यावरच्या स्वारीत एक फार मोठी राजकीय चूक केली. आपल्या प्रमाणेच विजापूरचा आदिलशाह शिवाजीराजांचा शत्रूच आहे आणि तोही शिवाजीराजांशी पन्हाळगड आघाडीवर झुंजतो आहे ही सरळ गोष्ट आपल्यालाशिवाजीविरुद्ध फायद्याचीच ठरणार आहे. एवढी साधी अक्कल शाहिस्तेखानाला जपता आली नाही. त्याने विजापूरकरांचाच आदिलशाही किल्ला किल्ले परिंडा हा काबीज केला! वास्तविक विजापूरकर हे यावेळी शाहिस्तेखानाचे मित्रच नव्हते का पण शाहिस्तेखानाने मित्राचाच खिसा कापला. त्याचा परिंडा जिंकला. 

हे 
घडलेले पाहताच विजापूरचा आदिलशाह भूकंपासारखा हादरला. शाहिस्तेखानाने मदत तर राहोच पण आपल्यावर घावच घातला हे पाहून आदिलशाहने शिवाजीमहाराजांच्या विरुद्ध घडलेली युद्धआघाडी एकदम बंद करून टाकली. महाराजांच्यावर पडलेला प्रचंड युद्धभार एकदम कमी झाला. महाराजांनीही यावेळी आदिलशाहीविरुद्ध कोणतीही हालचाल न करण्याचाच विवेक केला. काम नेहमी मुत्सद्दी विवेकाने करावे.