शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नेहमीचस्मितहास्य तरळत असे , असे अनेक स्वकीय आणि परकीय भेटीकारांनी लिहून ठेवले आहे. आपल्याला आजही महाराजांच्याव्यक्तिमत्वाबद्दल कुतूहल असते. समर्थांनीही आवर्जून लिहिले आहे की , ' शिवरायाचे आठवावे रूप '. रूपानं महाराज कसे होते ?सावळे की गोरे ? काही युरोपीयभेटीकारांनीही महाराजांना गौरवर्णाचे म्हटले आहे. त्याअथीर् ते अगदी कोकणस्थीगोऱ्या रंगाचे नसले , तरी अधिक जवळ गव्हाळ रंगाचे असावेत. मुंबईच्या शिवछत्रपतीम्युझियममध्ये ( पूवीर्चे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) महाराजांचे एक उभे रंगीत चित्र (मिनिएचर) आहे.
त्यात महाराजांचा रंग सावळा दाखविलेला आहे. हे चित्र चित्रकाराने इ.स. १७०० च्या जरानंतरच्या काळात चितारलेले असावे , असे तज्ज्ञांचे मत आहे. चक्क काळ्या रंगात पं. जवाहरलाल नेहरू यांचीही चित्रे चित्रकारांनी काढलेली आहेत. पण नेहरूंचे गोरे देखणेपण आपण प्रत्यक्ष पाहिलेले आहे. चित्रकाराने काळ्या वा वेगळ्या रंगात चित्र काढले , ही त्या चित्रकाराची शैलीआहे. तसेच महाराजांचे मुंबईचे हे चित्र आहे. हे चित्र मूळ साताऱ्याच्या छत्रपती महाराजांच्यावाड्यातूनच विश्राम मावजी या इतिहासप्रेमी गृहस्थांना मिळाले. हा राजघराण्याचा आणिछत्रपतींच्या राजवाड्याचा चित्र प्राप्तीधागा लक्षात येतोच. युरोपीय लोक सगळ्याच भारतीयांना' काळे ' म्हणतात. पण त्यांनीही महाराजांना गौर रंगाचे सटिर्फिकेट दिलेले पाहून महाराजांच्या गव्हाळ मराठी गौरवर्णाची ओळख पटते.
महाराज आग्ऱ्याला गेले , तेव्हा त्यांना शहरात प्रवेश करताना परकालदास या नावाच्या राजपूतराजकीय प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहिले. त्यानेही आपल्या एका पत्रात महाराजांचे वर्णन लिहिले आहे. तो म्हणतो , ' शिवाजीराजे तेजस्वी आणि अस्सल राजपूतासारखे दिसतात. 'औरंगजेबाच्या दरबारात अपमान झाल्यामुळे महाराज संतापले. तेव्हा ते कसे धगागलेले दिसले ,याचेही वर्णन राजपूत प्रतिनिधीच्या पत्रात सापडते. महाराजांच्या दृष्टीत विलक्षण त्वरा होती. महाराजांच्या सहवासात राहिलेल्या परमानंद गोविंद कविंदाने महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णनशिवभारतात लिहून ठेवले आहे. एकाच वाक्यात सांगायचे तर त्याचे सार , महाराज राजकुलीन, तेजस्वी , तडफदार , प्रभावी आणि सावध व्यक्तिमत्त्वाचे होते. ऐतिहासिक कागदपत्रांतून आणिविशेषत: त्यांनी लिहिलेल्या पत्रांतील भाषेतून त्यांचे व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यापुढे असेचजाणवते. राजेपणाचे त्यांचे दर्शन अगदी सहज जन्मजात दिसते. त्यात कृत्रिमता वा बनावट आव दिसत नाही. छत्रपती , सिंहासनाधीश्वर , क्षत्रिय कुलावतांस , महाराजा या राजविशेषणांचे 'बेअरिंग ' महाराज अगदी सहज , आपादमस्तक सांभाळत होते. राजेपण वा राणीपण एवढ्या तोलामोलाने व्यक्तिमत्त्वात सांभाळणे , हे योगसाधना करण्याइतकेच अवघड आहे.
महाराज तेजावरच्या प्रवासात असताना एका छावणीत पाँडिचेरीचा माटिर्न नावाचा फेंचप्रतिनिधी महाराजांस भेटावयास आला. भेटीच्या शामियान्यात तो थोडा आधीच उपस्थित झाला. या शामियान्यात महाराज नंतर प्रवेशले. माटिर्नने शामियान्यातील त्या सदरेचे (छोट्यादरबाराचे) वर्णन लिहून ठेवले आहे. प्रत्यक्ष महाराज शामियान्यात कसे प्रवेशले अन् त्यावेळीदरबारी लोक (मराठे सरदार) कसे उभे राहिले आणि त्यांनी कशी राजआदब सांभाळली ते लिहूनठेवले आहे. महाराज चालत राजमसनदीपर्यंत आले आणि बसले याचे फार सुंदर वास्तवपूर्ण चित्र त्याने शब्दांकित केले आहे. ते वाचताना समार्थांचेच शब्द आठवतात. ' शिवरायाचे कैसेबोलणे , शिवरायाचे कैसे चालणे , शिवरायाची सलगी देणे कैसे असे ' त्याची चुणूक माटिर्नच्याशब्दांतून व्यक्त होते. आमची ' मराठा राजसंस्कृती ' खरोखर फार उदात्त आहे. आम्ही कोणी आज शिरपेच तुरे घालणारे राजेमहाराजे नाही. पण आम्ही आपापल्या आमच्या जीवनातमर्यादित राजेच आहोत ना ? ते खानदानी मराठी संस्कृतीचे देखणेपण अकृत्रिमरित्या आम्हीसांभाळलेच पाहिजे. ती आमची जबाबदारी आहे. शिवचरित्रातून आणि जिजाऊसाहेबांच्याचरित्रातून हे शिकता येते.
महाराजांच्या वेशभूषेबद्दल आपण पूवीर् पाहिलेच. परमानंद कविंदाने लिहिले आहे त्यात एकमामिर्क नोंद केली आहे. अफझलखानाच्या भेटीला जातानाचे महाराजांचे वर्णन करताना तो लिहितो की , ' महाराजांची दाढी कात्रीने नीटनेटकी केलेली होती. ' ही गोष्ट तशी अगदी किरकोळ आहे. पण त्यातून त्यांचा ' एस्थेटिक सेन्स ' दिसून येतो.
महाराजांची जुनी चित्रे उपलब्ध आहेत. त्यात ब्रिटिश म्युझियम लायब्ररी , लंडन येथील चित्रांतमहाराजांनी थोडेसे उभे गंध कपाळावर लावलेले असावे की काय , असा भास होतो. पण अन्यचित्रांत गंध लावलेले कुठेही दिसत नाही. ही चित्रे प्रोफाइल आहेत. पण कोल्हापूरच्या न्यूपॅलेसमधील म्युझियममध्ये आणि हैदराबादच्या सालारजंग म्युझियममध्ये महाराजांचे एकेकचित्र आहे. ही दोन्ही चित्रे समोरून , जरा कोनात काढलेली आहेत. अशा चित्रांना ' तीन चष्मी चित्र ' म्हणत. यात व्यक्तीचे दोन डोळे आणि एक कान दिसतो. कोल्हापूर आणि हैदराबाद येथील चित्रे अशीच तीन चष्मी आहेत. त्या चित्रांत महाराजांचे कपाळ समोरून दिसते , पण कपाळावर कोणत्याही प्रकाराचे वा आकाराचे गंध लावलेले दिसत नाही. सणसमारंभ , पूजाअर्चा वाराज्याभिषेकासारखा सोहळा चालू असताना महाराजांच्या कपाळावर नक्कीच गंध आणि कुंकुमतिलक असणारच. पण दैनंदिन जीवनात तसा होता की नव्हता , हे चित्रात वा कोणत्याहीपत्रात दिसत नाही.
वेशभूषेच्या संदर्भात महाराजांच्या बाबतीत घडलेली एक गंमत सांगतो. महाराज एकदा राजापूर शहरात पालखीतून चालले होते. सांगाती थोडेफार सैनिक होते. रस्त्याने पालखी जातअसताना दोन्ही बाजूंना नागरिक मंडळी स्वारी बघत होती. त्यातच एक- दोन इंग्रज उभे होते.राजापुरात ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी वखार होती , हे आपणांस माहीतच आहे. पालखी चालत असताना महाराजांचे सहज लक्ष त्या इंग्रज पुरुषांकडे गेले. इंग्रजांची वेशभूषा अर्थात इंग्रजीच होती. त्यांनी डोक्याला केसांचा टोप ( विग) घातलेला होता. महाराजांच्या मनात हे वेगळेच केस पाहून कुतूहल निर्माण झाले. महाराजांनी पालखी मुद्दाम त्या इंग्रजांच्या जवळूननेली. थांबविली. अन् त्यांनी त्या इंग्रजांच्या कानाशेजारी आपल्या हाताने केसात बोटांनी चाचपून पाहिले. अन् महाराजांच्या लक्षात आले की , हे केस वरून लावलेले आहेत. नैसगिर्क नाहीत.त्यांना गंमत वाटली. इंग्रजांनाही गंमत वाटली. पालखी पुढे गेली.
आग्ऱ्यात महाराजांनी आपल्या वकिलांमार्फत आग्ऱ्याच्या बाजारातून काही जडजवाहीर आणि मौल्यवान कापडचोपडही खरेदी केले होते. त्यावरून महाराजांना वेशभूषेबद्दल नक्कीच थोडीफार तरी आवड होती असे दिसते.
महाराजांच्या अंतरी नाना कळा होत्या. पण वेष बावळा नव्हता! नीटनेटकेपणा असलाच पाहिजे.साधेपणाही पाहिजे. बावळेपणा असता कामा नये.
महाराजांनी आपल्या खाश्या जिलेबीस ( म्हणजे सैन्याच्या खास राजपथकास) चेकसारखे पोषाख केले होते ? अशी नोंद आहे. म्हणजेच युनिफॉर्मची कल्पना त्यांच्या मनात निश्चित होती.