शिवचरित्रमाला - भाग १२३ - राखावी बहुतांची अंतरे

आपल्याला नेहमीच कुतुहल वाटत असते ,की एवढा मोठा हा लोकनेता आणि सिंहासनाधिश्वर छत्रपती राजा वागत कसा होता बोलत कसा होता एकूण स्वभावानेच कसा होता! राजा कधी थट्टा विनोद करीत असे का की सतत गंभीर होता शिवाजी महाराजांच्याबद्दल एक मामिर्क विधान श्रीसमर्थांनी केले आहे. 'शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायाचे कैसे चालणे शिवरायाचे सलगी देणे कैसे असे ?' या प्रश्ानर्थक वर्णनातच महाराजांचे व्यक्तिमत्त्व डोळ्यापुढे येते. महाराजांच्या चेहऱ्यावर सततच स्मितहास्य तरळत असे त्यांना भेटलेल्या युरोपीय वकिलांनी आणि प्रवाशांनी नोंदवून ठेवले आहे. या त्यांच्या स्मितहास्यातच महाराजांचे लोकसंघटनेचे यश आणि वर्म स्पष्ट होते. त्यांच्या एकूणच प्रचंड आणि अत्यंत अवघड अशा उद्योगात लोकसंपर्काला आणि प्रसंगी समोरच्या विरोधकालाही जिंकून घेण्याचे बळ होते. स्मितहास्य ही त्यांच्या बिझनेस स्कील आणि मॅनेजमेंटमधली सर्वात मोठी इन्व्हेंस्टमेंटमधली होती. मी हे इंग्लिश शब्द जाणूनबुजून वापरतो आहे. कारण ते आम्हा आजच्या पुरोगामी आणि पॉलिश्ड मंडळींना चटकन समजतात आणि अपील होतात! 

महाराजांच्या या वागण्याबोलण्याबाबतची 
सर्वात पहिलीच नोंद अन् तीही पूर्ण विश्वसनीय अशी परमानंद नेवासकरांनी शिवभारतात करून ठेवली आहे. महाराज १५ १६ वर्षाचे असतानाच त्यांनी सुरू केलेल्या स्वराज्यस्थापनेची चुळबूळ जागच्याजागीच मोडून काढण्यासाठी विजापूरच्या आदिलशाहने आपला एक बडा सरदार अंबाजी घोरपडे यांस सैन्यनिशी महाराजांविरुद्ध मावळात रवाना केले. वास्तविक घोरपडे सरदार महाराजांना धरावयास किंवा मारावयास किंवा निदान प्रचंड दमदाटी करावयास अन् गप्प बसवावयास आले होते. पण महाराजांनी त्यावेळी त्या छोट्याशा वयात सरदारसाहेबांशी भेट आणि मुलाखत घेऊन असे गोड भाषण केले आणि त्यांना पटवून दिले की , ' आम्ही बादशाहांच्या विरुद्ध बंडाळी करीतच नाही. बेवसाऊ पडलेल्या गडांचा आणि वाड्याघोड्यांचा नीट बंदोबस्त ठेवीत आहोत तेही बादशाहांच्या हितासाठीच. 

परमानंदांनी 
महाराजांची ही पहेली मुलाकात सविस्तर लिहून ठेवली असती तर किती बरेझाले असते! पण त्यांनी या बाबतीत एवढेच लिहिले आहे की एखादा गारुडी नागाला ज्याप्रमाणे भुलवतो झुलवतो अन् सफाईने परतवून लावतो त्याचपद्धतीने मोठ्या कुशलतेने महाराजांनी घोरपड्यांना विनासंघर्ष गोड बोलून परतविले. हे प्रकरण प्रत्यक्ष महाराजांच्याच तोंडून बदललेले परमानंदाने नोंदविले आहे. 

आपल्या देशात अनेक धर्म 
सांप्रदाय पंथ-उपपंथ पूवीर्पासूनच अस्तित्त्वात आहेत. भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदाय शाक्तपंथ गाणपत्य सांप्रदाय शैव वीरशैव महानुभाव ,नाथसांप्रदाय हटयोगी कर्मठवैदिक दत्तसांप्रदाय पुरी आणि गिरी गोसावी सांप्रदाय श्वेतांबरआणि दिगंबर जैन धमीर्य झरॅस्टरियन पारशी यहुदीज्यु सुफी सांप्रदाय शिया- सुनी ,जेस्युईट शीख (नानक पंथीय) रोमन कॅथॉलिक प्रोस्टेस्टंट अघोरी भक्तीपंथ पंचमकासादि आचार पाळणारे शाक्त इत्यादी आणखी काही पंथ सांप्रदाय आपल्या सर्व भेद पोटभेदांसहशिवकाळातही नांदत होते. त्यात अनेकांची प्रार्थनास्थळे आणि मठआखाडे इत्यादीही अस्तित्त्वात होते. पण शिवकालीन कागदपत्रांचा जास्तीतजास्त खोलवर अभ्यास करीत असतानाही वरील विविध भक्तीमागीर्यांच्यात जातीय दंगेधोपे आणि त्यातून रयतेचे होऊ शकणारे नुकसान कधीही घडलेले दिसून येत नाही. सर्वधर्मसमभावाची घोषणा न करताही हिंदवी स्वराज्याचे आचरणसमभावी होते. सर्वांचे आचार सणसमारंभ उत्सव मिरवणुका यात्रा- जत्रा आनंदात चालत होत्या. या उलट मोगली राज्यात सत्ताधीश भेदभावाने आणि अन्याय अत्याचाराने वागल्याचेअसंख्य पुरावे मिळतात. औरंगजेबाने सतनामी गोसाव्यांवर जसे अत्याचार केले तसे शिया सांप्रदायिकांवरही केल्याच्या नोंदी आहेत. 

जरा 
विषयांतर करून एक गोष्ट नमूद कराविशी वाटते ती औरंगजेबाबाबत. औरंगजेब स्वत: कठोर धर्मव्रती होता. मूतीर्भंजनाच्याबाबतीत तर तो फार आग्रही होता. बना कदेर् मस्जिद तबाकर कुनिष्त असे औरंगजेबाचे शिलालेख सापडले आहेत. याचा अर्थ असा मूतीर् नष्ट करून येथे मशिद तयार केली असा आहे. बिदर (कर्नाटक) येथे श्रीनृसिंहाचे मंदिरभंग करून त्यावर कोरलेला त्याचा शिलालेख आजही अस्तित्त्वात आहे. त्याचे इतरही धर्मवेड प्रकार ऐतिहासिकपुराव्यांत उपलब्ध आहेत. पण एक गोष्ट विलक्षण होती की औरंगजेबाने कोणत्याही जातीधर्माच्या संतसत्पुरुषांच्या समाध्यांना अजिबात धक्का लावलेला नाही किंवा त्यांचाकोणत्याही प्रकारे अपमान केलेला नाही. हा एक औरंगजेबी स्वभावातील गोड चमत्कारच म्हणावयाचा! महाराष्ट्रातील श्रीज्ञानेश्वर श्रीदेव श्रीचिंचवड श्रीत्र्यंबकेश्वर श्रीसासवड ,श्रीसज्जनगड श्रीदेवगिरी श्रीपैठण या संतसत्पुरुषांच्या समाधीस्थळांवर औरंगजेबाची सत्ताप्रस्थापित झाली होती. पण त्याने तेथे असलेल्या समाध्यांना धक्का लावला नाही. इतकेच नव्हे ,तर ऐतिहासिक मराठी थोर राजपुरुषांच्या समाध्या आणि वृंदावने असलेल्या रायगड सिंहगड ,वढू इंदापूर श्रीगोंदे पुणतांबे इत्यादी ठिकाणी असलेल्या तसे पाहिले तर शत्रूपक्षीयव्यक्तींच्या समाध्यांनाही त्याने हात लावला नाही. यातील त्याची नेमकी मानसिकता काय असावी ते समजत नाही. दारा शुकोह हा औरंगजेबाचा सख्खा थोरला भाऊ होता. राजकीयमहत्त्वाकांक्षेपोटी औरंगजेबाने त्याला अतिशय क्रूरपणाने दिल्लीत ठार मारले. दाराची साधी कबर हुमायून बादशाहाच्या कबरीच्या प्रांगणात आहे आणि होती. औरंगजेबाने आयुष्याच्या अखेरच्या पर्वात एक आज्ञापत्र काढून दाराशुकोहच्या कबरीजवळ रोज दिवा लावत जा असा आदेश दिलेला सापडतो. 

असो. हे झाले जरा 
विषयांतर. पण या सर्व पार्श्वभूमीवर हिंदवी स्वराज्यातील सर्वधर्मांबाबतचीआस्था आदर आणि आचरण उठून दिसते. शिवाजीमहाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचे तरुणपण औरंगजेबाच्या कैदेत गेले. तेथे औरंगजेबाची एक मुलगी झिनतुन्निसा ही या शाहूराजांशी आईसारखीच वागली. शाहूराजांना इस्लामची दीक्षा द्यावी असे औरंगजेबाचे मनांत होते. हे ऐतिहासिक सत्य आहे. या झिनतुन्निसाने आपल्या बापाचा हा हट्ट मोडून काढला. त्यामुळेशाहूराजे स्वधर्मातच राहू शकले. एकूणच झिनतुन्निसाच्या उदार मातृतुल्य पेमाचा वागणुकीचा आदर छत्रपती घराण्यानेही सांभाळला. या झिनतुन्निसाच्या मृत्युनंतर (ती दिल्लीत खूप म्हातारीहोऊन वारली. तिची कबर दिल्लीत आहे) छ. शाहूराजांनी तिची स्मृती म्हणून साताऱ्यात तिची एक प्रतिकात्मक समाधी कबर बांधली. त्या कबरीची व्यवस्था आजही अतिशय आस्थापूर्वक ठेवली जाते. 

जाता 
जाता हेही सांगून टाकूया का त्यात शिवाजी महाराजांची संस्कृती दिसते. औरंगजेब आणि अन्य दक्षिणी बादशाही घराणी आणि या सर्वांचे सरदार दरकदार यांना शिवाजीमहाराजांनी लिहिलेली काही पत्रे आज उपलब्ध आहेत. त्यात महाराजांनी या सर्व शाही मंडळींनाबहुमानाथीर् विशेषणांनी संबोधिले आहे. पण त्यांच्यासंबंधात महाराजांनी अन्य कोणलाही लिहिलेल्या पत्रात त्यांनी या शाही मंडळींना बहुमानानेच उल्लेखिले आहे. औरंगजेबाचाही उल्लेख ते तसाच करताना दिसतात. महाराजांची संस्कृती आणि सभ्यता राजकुलीन होती.