राजकारणात ओळखायची असतातशत्रूपक्षाकडील माणसांची मन. शत्रूपक्षाकडे खजिना किती आहे आणि युद्धसाहित्य किती आहे हे समजावून घेण्यापेक्षाही महत्त्वाचं असतं शत्रूपक्षाकडे माणसं कशी आहेत.औरंगजेब हा समजायला सर्वांत अवघडमाणूस. अगदी खरं सांगायचं तर महाराज शिवाजीराजे यांना सुद्धा आग्रा प्रकरणात औरंगजेब समजला नव्हता असं म्हणावं लागेल ते फसले आणि औरंगजेबाच्याच कैदेत पडले. तेही त्याच्या घरी जाऊन. महाराजांना फसवणं ही केवढी अवघड गोष्ट होती. पण मिर्झाराजांच्या वचनामुळे महाराज फसले. खरं म्हणजे मरणच त्यांनी ओढावून घेतलं होतं. पण प्रतिभेची एक चाणक्यभरारी मारून महाराज सुखरूप सुटले. आग्य्राला जाण्यापूवीर् मोगलांनाद्यावे लागलेले तेवीस किल्ले आता जणू महाराजांच्या ध्यानी , मनी , स्वप्नी विनवीत होते की ,महाराज औरंगजेबाच्या मगरमिठीतून तुम्ही सुटलात , आता तुम्ही आम्हालाही सोडवा.
औरंगजेबाच्या ध्यानीमनी हेच किल्ले सतत आक्रोश करीत होते , सुटून परत मराठी स्वराज्यात जाण्याकरता. औरंगजेब आग्य्रात बसून दक्षता घेता होता. तूर्त तरी तह कायम राखण्याचं वचनमहाराजांनी औरंगजेबाला दिल होतं. म्हणून समुद शांत होता. पण त्या शिवसागराच्या तळाशी असलेला ज्वालामुखी गडगडत होता. त्सुनामी लाटांसारखा. औरंगजेबांची सूक्ष्म हालचाल त्याच्या मनाच्या आतल्या कप्यात चालू होती. म्हणजे त्याचं असं झाले , सिंहगड किल्ल्यावरती यावेळी (१२ जून १६६५ पासून पुढची चारवर्ष) औरंगजेब दिल्ली-आग्य्राहून लक्ष ठेवीत होता. यावेळी औरंगजेबाचा किल्लेदार सिंहगडावर होता सर्फराजखान. त्याचीच सिंहगडावरती किल्लेदार म्हणून दिलेरखानाने आणि मिर्झाराजांनी नेमणूक केली होती.
दोन वर्षे (१६६६ ऑक्टोबरपर्यंत) तोच औरंगजेबचा झेेंडा सिंहगडावर सांभाळीत होता. पणअचानक १६६६ च्या नोव्हेंबरात औरंगजेबाने उदयभान राठोड याला तातडीने दिल्लीहून सिंहगडाकडे रवाना केले , किल्लेदार म्हणून का ? का - ते समजायला औरंगजेब समजावूनघ्यायला लागेल. वास्तविक हा सर्फराजखान अतिशय शूर होता. कडवा , निष्ठावंत सरदार होता. अन् सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो मुसलमान होता. तरीही औरंगजेबाने त्याला काढूनउदयभान राठोडला सिंहगडचा किल्लेदार नेमला. का ? सर्फराजखानापेक्षाही काही जास्त गुण उदयभान मध्ये होते ? होय. होते. तेच समजावून घ्यायचेत.
हा उदयभान राजपूत आहे याचं नाव उदयभानसिंह राठोड असे आहे. अजमेरपासून सुमारे २५किमीवर भिनाय या नावाचं एक ठाणं आहे. तो या भिनायचा राहणारा त्याला दोन मुलगे होते. तरुण. बिशनसिंग आणि किशनसिंग. सारं घराणंच दिल्लीच्या तख्तापुढे इमानदारीनं कमरेइतकंवाकलेलं. उदयभान सिंहगडावर किल्लेदार म्हणून आला. या सिंहगडाच्या बरोबर दक्षिणेला अवघ्या २० किमीवर एक सिंह डोळे वटारून बसला होता. त्याचं नाव शिवाजीराजा. सिंहगड आणि राजांचा राजगड असे समोरासमोर जणू वाघसिंहासारखे शेपट्या आपटीत होते. म्हणजे उदयभानला सिंहगड किल्याचा किल्लेदार म्हणून बादशहांनी जबाबदारी आपल्यावरच का सोपविली याची पुरेपूर जाणीव झाली. आजही आपण सिंहगडावरच्या बालेकिल्यातीलश्ाीकोंडणेश्वर महादेवाच्या देवळापाशी उभं राहून राजगडाकडे नजर टाकली तर असा भास होतो की , आपल्या शेजारी उदयभान किल्लेदाराच उभा आहे अन् तो सारखा टक लावून राजगडाकडे बघतो आहे.
कदाचित उदयभानचीही सिंहगडावरील नेमणूक पाहून असं आपल्या कल्पनेत चित्र तरळतं की ,औरंगजेबाची लाडकी लेक झेबुन्निसा हीच बापाला विचारतीय , ' अब्बाजान आपण सर्फराजखानासारख्या नेकजात , बहाद्दूर सरदाराला काढून या उदयभान राजपूताची त्या जागेवर का नेमणूक करत आहोत ? हा सर्फराजाच्या रुस्तमीचा आणि वफादारीचा अपमान नाही का ? तो काय कमी आहे उदयभानापेक्षा ?'
अन् मग आपल्या अभ्यासातून दिसणारा औरंगजेबही तिला उत्तर देताना दिसू लागतो की , ' नहीं बेटा! सर्फराजखानाची बहादुरी कमी नाही. पण इस्लामच्या तख्यावर सर्फराजखानापेक्षा जास्त निष्ठा आहे. उदयभान राजपुताची. अगं , हे मोगली राज्य आपल्याला मिळालंय आणि टिकलंय या राजपुताच्यामुळेच. आणि पुढेही टिकणार असेल तरीही राजपुतांच्यामुळेच. तो भयंकर सीवादिल्लीच्या या आलमगीरापुढे नजराणे घेऊन आला , तो कोणामुळे ? मिर्झाराजे जयसिंगामुळे आणि आमच्या हातावर मूठभर माती देऊन पसार झाला तो कोणामुळे ? तो आमच्याच एकाफुलादखानामुळे दक्षिणेच्या इतिहासातही थोडं मागे पहा! याच सीवाचा बाप शहाजी भोसला आदिलशहाच्या कैदेत पडला तो कोणामुळे ? तो बाजी घोरपडे मुधोळकर यांच्यामुळे आणि सुटला तो विजापूरी सरदार फत्तेखान याच्या चुकीच्या युद्धपद्धतीमुळे. फत्तेखानाचा सीवाने साफ पराभव केला आणि शहाजी भोसला कैदेतून सुटला तर लक्षात ठेव बेटी , आम्हा आलमगीरांची राज्येचालतात ती इथल्याच लोकांच्या इमानदारीवर आणि पराक्रमावर म्हणून आम्ही सिंहगडावर किल्लेदारी दिली आहे उदयभान राठोडला. सर्फराजला काढून.