अलीकडेच मुंबईत पडलेल्या प्रलयंकारी पावसाच्या दिवशी एन. सी. पी. ए मधून ' वराती 'ची तालिम आटोपून मी व माझी मैत्रिण मीना फडके ,कमरेएवढया साचलेल्या पाण्यातून चिंब भिजून माझ्याघरी पोहाचलो. मीनाला त्या रात्री माझा गाऊन घालून माझ्याचकडे रात्र घालवावी लागली. ही गोष्ट मी सगळयांना ऐकवली होती. भाईंच्याही ती कानावर गेली. त्यावर ते म्हणाले , ' तरीच परवा यशवंत देवांना कुणीतरी म्हणाले , की गाऊन दाखवा. ' तर नीला म्हणाली ,' बरोबर आणला नाही. '