पु.लं. आणि सुनिताबाई मर्ढेकरांच्या कवितांचं छान सादरीकरण करत. एकदा एन. सी. पी. ए. थिएटरमध्ये हा मर्ढेकरांच्या कवितांचा कार्यक्रम होणार होता. त्यावेळी थिएटरच्या गेस्ट हाउसमध्ये जेवणाची सोय नव्हती, म्हणून जयंतराव साळगावकारांनी दुपारच्या जेवणाची व्यवस्था आपल्या घरुन केली. ऐन वेळी कुणी पाहुणा आला तर गैरसोय म्हणून जेवण थोडं अधिकच पाठवलं होते. तो मोठ्ठा डबा पाहिल्यावर पु.ल. लगेच म्हणाले,
‘अहो, आम्हाला संध्याकाळी लोकांना मर्ढेकर ऐकवायचेत, ढेकर नव्हे!’