लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट
माझी मराठीची बोलु कौतुके। परि अमृताते ही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.
पुलंच्या ‘ सुंदर मी होणार ’या नाटकावर आधारित असलेला ‘ आज और कल ’हा हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. त्याबद्दल बोलताना पुल म्हणाले, ‘हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणं दोनच दिवस चालला. ‘ आज और कल !’