एकदा पुलं गोव्याहून पुण्याला मोटारनं येत होते. त्यांच्यासोबत वसंतराव देशपांडे आणि सुनीताबाई होत्या. वाटेत एक जंगल लागलं. जंगलाच्या आडवळणावर एक महाकाय बायसन (गवा / रानरेडा) त्यांच्या गाडीसमोर आडवा आला.
रानरेडा हा महाशक्तिशाली आणि आक्रमक प्राणी ! त्यानं धडक दिली तर ट्रकही आडवा होईल. तिथं फिअॅट गाडी काहीच नाही. एक अर्थानं समोर प्राणसंकटच उभं ठाकलेलं.
प्राणभयानं घाबरुन गेलेले वसंतराव देशपांडे पुलंना हळूच म्हणाले, ‘भाई ही इज चार्जिंग !’
वसंतरावांच्या तोंडचे हे इंग्रजी उद्गार ऐकून तसल्या जीवघेण्या प्रसंगातही पु.ल. म्हणाले, ‘ त्या गव्याला कळू नये, म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलताहेत !’