हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ‘ त्यात काय ? ‘सफरचंद ’ म्हणावं. ’
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ‘ एअरहोस्टेसला आपण ‘हवाई सुंदरी ’ म्हणतो, तर नर्सला ‘ दवाई सुंदरी ’ का म्हणू नये ?आणि वाढणा-याला आपण जर ‘ वाढपी ’ म्हणतो, तर वैमानिकाला ‘उडपी ’ का म्हणू नये ?’
त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ‘ पिताश्री ’ किंवा ‘ राष्ट्रपिता ’म्हणतात .