लोकशाही : एक सखोल चिंतन...खिल्ली पुस्तक Khilli by Pu La Deshpande

लोकशाही : एक सखोल चिंतन (पुलं)

..... ’लोकशाही म्हणजे लोकांनी चालवलेले लोकांचे आणि लोकांच्यासाठी असलेले - म्हणजे थोडक्यात आपल्यासाठी नसून लोकांसाठी असलेले सरकार - लिंकन (थोडा फेरफार करून. अधिक माहितीसाठी काही वाचण्याची गरज नाही)

इसापनीतीत एक गोष्ट आहे. बेडकांना एकदा वाटते, आपल्याला राजा हवा. वास्तविक त्यांना राजाची आवश्यकता का भासवी, कोण जाणे. भासली खरी. शेवटी देवाने ओंडका फेकला. बेडकांनी आठ दिवसात त्याच्यावर नाचायला सूरुवात केली - तेंव्हा देवाने अधिक कडक राजा हवा म्हणून बगळा पाठवला. पूर्वीचे चैनी राजे प्रजेच्या खर्चात विहार करीत, ते सोडून ह्या बाहेरुन शूभ्र दिसण्या-या राजाने, प्रजेचा चक्क आहारच करायला सूरुवात केली. बेडकांनी हाही राजा परतवला आणि आपल्यातून राजा निवडायचे ठरविले. तो अजूनपर्यंत निवडला गेला की नाही ते कळत नाही. आरडाओरडा मात्र चालोतो. दर पावसाळ्यात त्यांच्या सभा होतात. गळ्याचे गोळे फूगवून वृद्धदुर्दर भाषणे करतात. वर्षभर पून्हा काही ऎकू येत नाही. बहूधा मंडूकशाही सुरू झाली असावी वर्षातून एकदा निवडणूका देखील होत असाव्यात.
-----------------------------------------------------------


एका गांधी टोपीचा प्रवास

.... आजचा तरूण हे असलेच काही काही पाहात वाढला. धर्मातीत राज्यातल्या आकाशवाणीवर सकाळच्या वेळी ’देवा तुझ्याशिवाय आम्हाला आधार नाही’ ह्या अर्थाचे टाहो ऎकत आला. त्याच्य ऎन उमेदीच्या वर्षात भाषावार प्रांतरचनेचे वाद त्याने पाहिले. भाषिक द्वेषाची परिसीमा पाहिली. ज्या समाजाला शिक्षणाची दारे बंद होती, त्या समाजातून नवा सुशिक्षित वर्ग जन्माला आला. त्याने आपल्या पददलित समजाचे अंतरंग उघडे करून दाखवायला सूरुवात केली. त्यातुन क्षोभचे दर्शन घडू लागले. ....
.... हल्लीच्या पिढीला आदराची भावना नाही हे म्हणतांना ज्याच्याविषयी आदर बाळगावा अशी उभ्या देशातील किती माणसे त्यांना दाखवता येतील ? आमच्या विज्ञानविभागाचे प्रमूख सत्यसाईबाबांच्या मागून जाताना दिसतात आणि माणसाचे भविष्य माणसनेच घडवायचे आहे हे सांगण्या-यासमाजवादी तत्वज्ञानाचा घोष करणारे पूढारी मंत्रिपद मिळावे म्हणून गणपतिबाप्पाला सकडे घालतात.....
... एका बाजूला ३५ - ३५ मजल्यांच्या हवेल्या उठत असलेल्या तो पाहातो त्याबरोबर झोपडपट्ट्या वाढतांना त्याला दिसतात. लोकनेत्यांचे उच्चार आणि आचार यात त्याल ताळमेळ दिसत नाही. मग त्याचा संताप उफाळून येतो. तो नविन कवीच्या कवितांमधुन कधी निराशेचा, कधी वैतागाचा सूर घेवून बाहेर पडतो तर कधी विध्वंसाची भाषा करीत येतो. तरूण मनाच्या ह्या अस्वस्थतेने वडीलपिढी अस्वस्थ न होत, त्यांना बेजबाबदारपणाणे नावे ठेवतांना आढळते. प्रत्येक काळात पिढ्यांतली दरी असते. पण गेल्या काही वर्षात ती अधिकच भयान होवू लागली आहे. हल्लीच्या पिढीला मुल्यांची कदरच नाही हे म्हणणे कोडगेपणाचे आहे. चांगली मूल्ये जतन करण्यासाठी आयुष्याचा होम केलेली माणसेच त्यांना दिसली नाहीत.