लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट
माझी मराठीची बोलु कौतुके। परि अमृताते ही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.
मागितलेल्या सगळ्या गोष्टी मिळतातच असं थोडी असतं, माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढी ती दूर जातात. फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळ्याही गळून पडतात, ज्याला मनापासून आपलं मानलं तिच आपल्याला विसरुन जातात, फुले वाळू लागली की फुलपाखरं देखील सोडून जातात...