मैत्री .......Maitri......

मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला…
ऍकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी…
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात.........
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ….............
सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे….............
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आह............

-अनामिक