दूरदेशी गेला बाबा... गेली कामावर आई | |||||
नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही !! ध्रु !! | |||||
कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला | |||||
चार भिंतित धावुन दिसभर दमवला | |||||
' आता पुरे ! झोप सोन्या..' कुणी म्हणतच नाही !! १ !! | |||||
कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ? | |||||
कोणी बोलायाला नाही...कशी व्हावी कट्टी-बट्टी ? | |||||
खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही !! २ !! | |||||
दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही | |||||
दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही | |||||
फार वाटे जावे परी - मुठीमध्ये बोट नाही !! ३ !! | |||||
नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही | |||||
दूरदेशी गेला बाबा...... |
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके। परि अमृताते ही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.