येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला? - संदिप खरे....... Yein Swapnat Mitalya Dolyat Gheshil ka Mala...

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??

तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??








वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग

वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग

वेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला??


तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??







माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया

तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया

तुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला??

सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??








बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला


मौन माझे आता सांग बघते तुला


तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी


तुच सत्यातली मोहिनी लाजरी



अभ्र विरताना रात्र ढळताना येशिल का जरा??

कोणी नसताना काही कळताना येशिल का जरा??

तुझ्या नावात माझ्या नावाला घेशिल का जरा??

सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला? - संदिप खरे....... Yein Swapnat Mitalya Dolyat Gheshil ka Mala... by Sandip Khare Lyrics Marathi Lyrics