एवढंच ना? - संदिप खरे.....Evadach Na by SAndip Khare

एवढंच ना?

[ आयुष्यावर बोलू काही च्या उत्तरार्धाची सुरुवात अनेकदा या कवितेने होते. ]
एवढंच ना? एकटे जगू.. एवढंच ना?आमचं हसं, आमचं रडं, घेऊन समोर एकटेच बघू,


एवढंच ना?

रात्रीला कोण? दुपारला कोण? जन्माला अवघ्या या पुरलंय कोण?
श्वासाला श्वास, क्षणाला क्षण, दिवसाला दिवस जोडत जगू!

एवढंच ना?
अंगणाला कुंपण होतंच कधी, घराला अंगण होतच कधी,

घराचे भास , अंगणाचे भास, कुंपणाचे भासच भोगत जगू,

एवढंच ना?

आलात तर आलात, तुमचेच पाय, गेलात तर गेलात कुणाला काय?
स्वतःचं पाय, स्वतःचं वाट, स्वतःचं सोबत होऊन जगू

एवढंच ना?

मातीचं घर, मातीचं दार, मातीच घर, मातीच दार


मातीचं घर, मातीचं दार, मातीच्या देहाला मातीचे वार

मातीचं खरी, मातीचं बरी, मातीत माती मिसळत जगू

एवढंच ना?

एवढंच ना? - संदिप खरे.....Evadach Na by Sandip Khare