मराठी बोध वाक्ये (Marathi Bodh Vakye) Marathi Mhani

1. कुणीही कस दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.
 
2. पाण्यात राहायचे तर माशांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वताला मासा बनावे लागते.
 
3. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते , प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बर्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.
 

पु.लं. चे काही किस्से Pu La, Pu La Deshpande, P L Deshpande , Pu La Kisse

१)
त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".

२)
माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत
वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न
ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच
घाव घातला' .

शान्ता शेळके आणि पुलं! - किस्से आणि कोट्या ( Pu La Deshpande, P L Deshpande Kisse, Pu La Kisse )

'' हॅलो , शान्ताबाई ना ? मॉस्कोहून गोर्बाचेव्ह तुमच्याशी बोलू इच्छितायत . तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ... ''

'' काय भाई , तुम्ही नाव कधी बदललंत ? अं ?''

फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज बरोबर ओळखून , हसू आवरत शान्ताबाई पु . लं . ना दाद द्यायच्या ...

बारा ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज . शेळके यांचा आणि आठ नोव्हेंबर हा मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्त्व पु . ल . देशपांडे यांचा वाढदिवस . उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करीत ; तर साहित्यक्षेत्रातील ही दोन मोठी माणसं एकमेकांच्या अशा ' खोड्या काढीत ' साजरा करीत . पण पु . लं . आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा ' बारा जून ' हा ( भाईंचा स्मृतिदिनही हाच ) खास दिवस शान्ताबाईंनी आवर्जून सुनीताबाईंना भेटण्याचा दिवस असायचा .

पुलं, टिळक आणि चिवडा - किस्से आणि कोट्या ( Pu La Deshpande , Pu La Deshpande Kisse aani kotya , Pu la aani Tilak )

' माझे खाद्यजीवन ' या लेखात चिवड्यासंबंधी लिहिताना पुलं म्हणतात , '' चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा ! छत्रे यांचा ! महाराष्ट्रावर या तीन छत्र्यांचे अनंत उपकार आहेत . एक चिवडेवाले , दुसरे सर्कसवाले आणि तिसरे केरूनाना गणिती ! उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे ! कारण चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या ' रम ' ला जी झणझणीत साथ दिली , ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली ....'' 

हे वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरून गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी चिवडा केला . पंधरा - सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना सांगितले , कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो स्विकारा .
त्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा डबा पाठवला होता . 

कुणाला ? लोकमान्य टिळकांना ! लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा !

जगवले खाद्यजीवनाने - किस्से आणि कोट्या Pu La Deshpande Kadyajeevan Kadyajivan Pu La Deshpande kisse and kotya

हिंदी-चिनी युद्धाच्या वेळी आघाडीवरला एक मराठी सैनिक कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होता. त्यांच्या अंगावर पुरेसे लोकरी कपडे नव्हते. म्हणून बरोबर आणलेले काही दिवाळी अंक तो धगीसाठी जाळू लागला. जाळण्याआधी चाळता चाळता त्याला एका अंकात ‘ पु. ल. देशपांडे ’ हे नाव दिसले. लेखाचे नाव दिसले. लेखाचे नाव- ‘ माझे खाद्यजीवन ’! तो अंक आगीत टाकण्याआधी त्याने वाचायला घेतला. थंडीत एकूणच जिवाला तो वैतागला होता. पण पुलंचा हा लेख वाचल्यावर ‘ छे ! छे ! हे सारे खाण्यासाठी तरी मला जगलेच पाहिजे ’ असा त्याने आपल्या मनाशी निर्धार केला. तुमच्या लेखामुळे मला जगावेसे वाटले असे त्याने पुलंना कळवले तेव्हासुद्धा पुलंची तीच गत झाली.

पुलंचा हजरजबाबी विनोद - किस्से आणि कोट्या ( Pu La Deshpande, Vinod Pu la deshpande kathakathan

पुलंचा हजरजबाबी विनोद हा तर विलक्षण आहे. भारती मालवणकर ही दामुअण्णा मालवणकरांची मुलगी. दिसायला खूपच सुस्वरुप. दामुअण्णांचे दोन्ही तिरळे डोळे मागल्या पिढीतल्या लोकांच्या परिचयाचे आहेत. दामुअण्णांच्या भारतीला पुलंनी प्रथम पाहताच ‘ ही मुलगी बापाचा डोळा चुकवून जन्माला आली आलीय ’ असे उद्गार काढले. 

पुलंकित Pulankit

१९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ' पुलायन ' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ' पुलंकित 'शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रियझाला. 

'सबकुछ पुलं'ला आमंत्रणच नाही - किस्से आणि कोट्या

पु. लं. चा शेवटचा चित्रपट म्हणजे ' गुळाचा गणपती '!त्यात सर्व काही पुलंचे होते.कथा , पटकथा , संवाद ,गीते , संगीत आणि दिग्दर्शन , एवढेच नव्हे तर नायकाची भूमिकासुद्धा! हा चित्रपट सर्वत्र चांगला गाजला. पण पुलंची कमाई काय ? पुण्यात ' गुळाचा गणपती ' प्रकाशित झाला तेव्हा तो चित्रपट पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रण सुद्धा नव्हते. पुलं , सुनीताबाई आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी तिकिटे काढून चित्रपटाचा पहिला खेळ पाहिला! 

कोल्हापुरी साज - किस्से आणि कोट्या

कोल्हापूरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मैत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सांगत होती , ' काय सुंदर सुंदर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात. अप्रतिम नमुने आणि सुंदर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळयात की दुसरं काहीच घालायला नको. ' हे ऐकत जवळपास असलेले भाई मिश्किलपणे हळूच म्हणाले , ' खरंसांगतेस की काय ?'क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर मैत्रिणीची लाजून व आमची हसून मुरकुंडी वळली.

गाऊन दाखवा - किस्से आणि कोट्या

अलीकडेच मुंबईत पडलेल्या प्रलयंकारी पावसाच्या दिवशी एन. सी. पी. ए मधून ' वराती 'ची तालिम आटोपून मी व माझी मैत्रिण मीना फडके ,कमरेएवढया साचलेल्या पाण्यातून चिंब भिजून माझ्याघरी पोहाचलो. मीनाला त्या रात्री माझा गाऊन घालून माझ्याचकडे रात्र घालवावी लागली. ही गोष्ट मी सगळयांना ऐकवली होती. भाईंच्याही ती कानावर गेली. त्यावर ते म्हणाले , ' तरीच परवा यशवंत देवांना कुणीतरी म्हणाले , की गाऊन दाखवा. ' तर नीला म्हणाली ,' बरोबर आणला नाही. ' 

ऊस Oos कोल्हापुरी शेक्सपीअर- किस्से आणि कोट्या

कोल्हापूर आणि तेथीलएकूणच भाषाव्यवहारम्हणजे पु . लं . च्यामर्मबंधातील ठेव .कोल्हापुरी समाजाइतकाचकोल्हापुरी भाषेचा बाजसांगतांना ते म्हणाले , ' इथेरंकाळयाला रक्काळाम्हणतात पण नगा - याचानंगारा करतात .कोल्हापुरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरीबाहेर येऊन आपल्याछातीवर हात बडवायला लावील असं आहे . ' त्यानं शेतात ऊंसलावला ' याचं इंग्रजी रुपांतर इथल्या मुन्सफानं एकदा 'he applied US in his farm' असं केलं होतं आणि त्यावेळच्या शुद्धलेखनाच्यानियमाप्रमाणं ' यू ' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता .

आज और कल - किस्से आणि कोट्या

पुलंच्या ‘ सुंदर मी होणार ’या नाटकावर आधारित असलेला ‘ आज और कल ’हा हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. त्याबद्दल बोलताना पुल म्हणाले, ‘हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणं दोनच दिवस चालला. ‘ आज और कल !’

चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं! - किस्से आणि कोट्या

अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले,
‘ चायनीज फूड स्टार्टस वुईथ चिलीज अॅण्ड एण्डस वुईथ लिचीज.
‘ चायनीज फूड पाहताच त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते.
जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात भूक लागते, हे लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ‘ आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. ’

चिनी स्वीट कॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे. या जेवणात मका फार वापराला जातो. त्यावर पुलंचं भाष्य : ‘ चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं !’ 

पिताश्री किंवा राष्ट्रपिता - किस्से आणि कोट्या

हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ‘ त्यात काय ? ‘सफरचंद ’ म्हणावं. ’
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ‘ एअरहोस्टेसला आपण ‘हवाई सुंदरी ’ म्हणतो, तर नर्सला ‘ दवाई सुंदरी ’ का म्हणू नये ?आणि वाढणा-याला आपण जर ‘ वाढपी ’ म्हणतो, तर वैमानिकाला ‘उडपी ’ का म्हणू नये ?’
त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ‘ पिताश्री ’ किंवा ‘ राष्ट्रपिता ’म्हणतात 

मामा नावाची गंमत - किस्से आणि कोट्या

गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ‘ मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत.’

मिठाई फुकट, वाटतं? - किस्से आणि कोट्या

एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पाहत पुलंनी ‘ बॉक्स मिळेल का ?’ म्हणून विचारलं.
‘ हो पण त्या बॉक्सला पैसे पडतील. ’ दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. ‘ अरे वा! म्हणजे मिठाई फुकट , वाटतं ? लगेच पुलं उद्गारले.

भाई, ही इज चार्जिंग! - किस्से आणि कोट्या

एकदा पुलं गोव्याहून पुण्याला मोटारनं येत होते. त्यांच्यासोबत वसंतराव देशपांडे आणि सुनीताबाई होत्या. वाटेत एक जंगल लागलं. जंगलाच्या आडवळणावर एक महाकाय बायसन (गवा / रानरेडा) त्यांच्या गाडीसमोर आडवा आला.

रानरेडा हा महाशक्तिशाली आणि आक्रमक प्राणी ! त्यानं धडक दिली तर ट्रकही आडवा होईल. तिथं फिअॅट गाडी काहीच नाही. एक अर्थानं समोर प्राणसंकटच उभं ठाकलेलं.

प्राणभयानं घाबरुन गेलेले वसंतराव देशपांडे पुलंना हळूच म्हणाले, ‘भाई ही इज चार्जिंग !’

वसंतरावांच्या तोंडचे हे इंग्रजी उद्गार ऐकून तसल्या जीवघेण्या प्रसंगातही पु.ल. म्हणाले, ‘ त्या गव्याला कळू नये, म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलताहेत !’

'अवतार' ध्यान! - किस्से आणि कोट्या

एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं.
प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ?
एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता.
तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ‘ हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले... ’
पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ‘ अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ‘ अवतार ’ ध्यान का म्हणतात, ते समजलं. ’ 

संजय उवाच! - किस्से आणि कोट्या

आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले,
‘ मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ‘ संजय उवाच ’ असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !’
पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ‘ त्यांना आत कंठ फुटला आहे ’ असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते.
त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ‘ गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही !

माझ्या बंधू आणि भगिनींनो...- किस्से आणि कोट्या

पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात पुलंच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांच्या असंख्य चाहत्यांपैकी काही निवडक जणांची प्रातिनिधिक भाषणं होणार होती. त्यात सुप्रसिद्ध वैज्ञानिक जयंतराव नारळीकरांचं नाव होतं.

भाषणाला सुरुवात करताना गर्दीचा वेध घेत नारळीकर म्हणाले,
‘ सभ्य स्त्रीपुरुष हो... मी नेहमीप्रमाणे भगिनींनो म्हणत नाही, कारण समोरच माझी पत्नी बसलेली आहे.

त्यानंतर पु.लं. जेव्हा बोलायला उभे राहिले, तेव्हा जयंतराव नारळीकरांच्या दाद मिळालेल्या भाषणाचा सूर पकडत भाषणाची सुरुवात करत म्हणाले,
‘ बंधू आणि भगिनींनो... समोर माझी पत्नी बसलेली आहे, तरीही मी ‘बंधू आणि भगिनींनो... ’ अशीच सुरुवात करतोय, कारण ती मला ‘भाई ’ म्हणते ’

कळलं हिंदीत पायाला पाव का म्हणतात? - किस्से आणि कोट्या

एका आजारात पुलंचीदोन्ही पावलं सुजूनगुबगुबीत दिसत होती .
त्यावेळी भेटायला आलेल्याएका मित्राला आपल्याआपल्या सुजलेल्यापायांकडे बोट दाखवत पु .ल . म्हणाले , ‘ हे माझेपाय बघ , म्हणजे तुलाकळेल , पायाला हिंदीत ‘पाव ’ का म्हणतात ते !’

गर्व से कहो हम हिंदुजा में है! - किस्से आणि कोट्या

‘ गर्व से कहो , हम हिंदू हैं, ’ म्हणणारे शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांना प्रकृति -अस्वास्थाच्या कारणास्तव माहिमच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

पुण्यात पुलंपर्यंत जेव्हा ही बातमी पोहोचली, तेव्हा बाळासाहेब हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ज्या खोलीत उपचार करुन घेत होते, त्या खोलीच्या दरवाज्यावर ठळक अक्षरात ‘ गर्व से कहो, हम हिंदुजा मे हैं ’ असं लिहून ठेवायला काहीच हरकत नाही, अशी पुलंनी उस्फुर्त प्रतिक्रिया केली. 

द्राक्ष संस्कृती आणि रुद्राक्ष संस्कृती! किस्से आणि कोट्या

प्रा. विद्याधर पुंडलिकांनी एका मुलाखतीत पुलंना विचारलं,
‘ तुम्हाला आवडलेली तुमची सर्वात धमाल कोटी किंवा विनोद कोणता ? (त्या पुंडलिकाला म्हणावं, ‘त्यानं फेकलेल्या विटेवर मी उभा नाही ’, ही माझ्यावरची कोटी सोडून.)’

तेव्हा पुलं म्हणाले, ‘ एखाद्या कवीला ‘ तुझं कुठलं यमक चांगलं जुळलं? असं विचारण्यासारखा हा प्रश्न आहे . तरी पण मला विचारताआहात , म्हणून सांगतो . मी पॅरिसला गेलो होतो . तिथं शॅम्पेनघेताना त्याच्या आणि आपल्या संस्कृतीत फरक काय , असं कुणी तरीविचारल्यावर मी चटकन म्हणालो , ‘ तुमची द्राक्ष संस्कृती आणिआमची रुद्राक्ष संस्कृती !’

गंमत म्हणून आणखी एक कोटी सांगतो . ब्लड बँकेसाठी नेहमी येणा -या - जाणा - या माणसाकडून रक्त मागणा - या लीलाबाईमुळगावकरांवरुन ‘ हिच्याइतकी रक्तपिपासू बाई मी आजवर पाहिलीनाही ’ असा विनोद मी केला होता ’ 

'बो'लावल्याशिवाय कुठंही जाऊ नये - किस्से आणि कोट्या

शंतनुराव किर्लोस्करांचं नाव घेतलं रे घेतलं की त्यांची गळ्यात ‘ बो ’ असलेली आणि सुटाबुटांतली तजेलदार मूर्ती डोळ्यांसमोर पटकन उभी राहते 
एकानं पुलंना सहजच विचारलं , ‘ भाई शंतनुराव किर्लोस्कर नेहमी ‘ बो ’ का हो लावायचे 
त्यावर पुलंनी लागलीच उत्तर दिलं , ‘ त्याचं काय आहे शंतनुरावांच्या लहानपणी त्यांच्या आईनं त्यांना सांगितलं होतं की ‘ बाबा रे बोलावल्याशिवाय कुठंही जाऊ नये .’ तेव्हापासून शंतनुराव ‘ बो ’ लावल्याशिवाय कुठंही जात नसत .’

लोकांना मर्ढेकर ऐकायचेत - किस्से आणि कोट्या

पु.लं. आणि सुनिताबाई मर्ढेकरांच्या कवितांचं छान सादरीकरण करत. एकदा एन. सी. पी. ए. थिएटरमध्ये हा मर्ढेकरांच्या कवितांचा कार्यक्रम होणार होता. त्यावेळी थिएटरच्या गेस्ट हाउसमध्ये जेवणाची सोय नव्हती, म्हणून जयंतराव साळगावकारांनी दुपारच्या जेवणाची व्यवस्था आपल्या घरुन केली. ऐन वेळी कुणी पाहुणा आला तर गैरसोय म्हणून जेवण थोडं अधिकच पाठवलं होते. तो मोठ्ठा डबा पाहिल्यावर पु.ल. लगेच म्हणाले,
‘अहो, आम्हाला संध्याकाळी लोकांना मर्ढेकर ऐकवायचेत, ढेकर नव्हे!’ 

गणपतीपप्पा ! Ganapatipappa किस्से आणि कोट्या

काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं.

गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ‘ पुलं ’ गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले,
‘ आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ‘ गणपतीपप्पा ’ झाल्यासारखा वाटतो ’

आठवणीतले पु.ल. - पु ल देशपांडे यांच्या विषयी लिहिले गेलेले

सुनीता ताईंच्या लेखणीतुन..

'पुलंकित' - (पुल चे इतर लेख, पत्रे ,भाषणे )

'पुलं च्या काही पुस्तकांतील लेख'

किस्से आणि कोट्या - अंजिरांचा काय भाव आहे? Kisse aani Kotya Pu La Deshpande

पुलंच्या लहानपणाचा एक प्रसंग...
पुलं तेव्हा चौदा पंधरा वर्षांचे होते. लोकमान्य सेवा संघात साहित्यसम्राट न. चिं. केळकरांचं व्याख्यान होतं. व्याख्यानानंतर होणा-या प्रश्नोत्तरात शाळकरी पुरुषोत्तमनं प्रश्न विचारला. त्या काळी भारतानं फेडरेशन स्वीकारावं, की स्वीकारू नये यावर चर्चा चालू होती. तर पुरुषोत्तमनं तात्यासाहेबांना विचारलं की फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारू नये ?
त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं, ‘ स्वीकारू नये, पण राबवावं. ’
यावर पुरुषोत्तम म्हणाला, मला आपलं उत्तर कळलं नाही.
त्यावर तात्यासाहेब म्हणाले, ‘ आपल्याला कळेल असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा. ’
त्यावर पुरुषोत्तमांनी तात्काळ प्रश्न विचारला
‘ पुण्याला सध्या अंजिरांचा काय भाव आहे ?’ 

पुलंच्या काहीच्या काही कविता Kavita Pu La Deshpande

मी पु. ल. दे.
मी एकदा आळीत गेलो
चाळ घेऊन बाहेर आलो
तोंडात भरली सगळी चाळ
मी तर मुलाखाचा वाचाळ

कधी पायांत बांधतो चाळ
उगीच नाचतो सोडून ताळ
वजन भारी उडते गाळण
पायांचीहि होते चाळण

गाळणे घेऊन गाळतो घाम
चाळणीमधून चाळतो दाम
चाळीबाहेर दुकान माझे
विकतो तेथे हंसणे ताजे

‘ खुदकन् हसू ’ चे पैसे आठ
‘ खो खो खो ’ चे एकशे साठ
हसवण्याचा करतो धंदा
कुणी निंदा - कुणी वंदा

कुणाकुणाला पडतो पेच
ह्याला कां नाही लागत ठेच ?
हा लेकाचा शहाणा की खुळा ?
मग मी मारतो मलाच डोळा 



च्यालेंज
अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा?
एकेकाळी रचीली ओवी । व्हाल का हो नवकवी?
मारे बोलवीला रेडा । रेघ बी. ए. ची ओलाडां!
तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी-गाणी
म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भितं चालवून दावा झणी
एक नाटक कंपनी बाप रखुमादेवीवरा । आमुचा च्यालेंज स्विकारा

उपमा
एकदा तुम्ही मला
छान दिसतेस
म्हणालांत पण
'समोरच्या सरोजबाईसारखी'
ते शब्द जोडून....


फोटोतली तरुणी
माझ्या खोलीतल्या
फोटोतली तरूणी परवा
मला म्हणाली
'मला चागंलेसे स्थळ
शोधून द्या ना-इथे
माझा जीव टांगल्यासारखं वाटतंय'

सुटका
बहात्तर कादबं-या लिहिणारी
माझी थोर साहित्यिक आत्या दम्याने
पंच्याहत्तराव्या वर्षी वारली
तेव्हा 'सुटली'
म्हणायच्या
ऎवजी तुम्ही 'सुटलो' म्हणालात....

घुंघुंर
....आणि मध्यरात्री.....
जेव्हा तारका खेळून दमल्या नव्हत्या
एकच सारेमय दूरवर भुंकत होता
नाक्यावरच्या पोलीस डुलक्या घेत होता
त्या वेळी तुझे घुंघुंर ऎकू आले.
अधांराच्या दालनातून
तुझ्या घुंघूंराच्या नादाने रातकिडे दचकले...
पण मी नाही दचकलो...
मी काय रातकिडा आहे?

हल्ली
हल्ली पुर्वीसारखे माझा
चेहरा टवटवीत दाखवणारे
आरसे मिळेनासे झाले आहेत.


लक्षण
मी केलेला केक
पण 'बकुळाबाईंनी पाठवला'
म्हटल्यावर, 'बेकार आहे' म्हणत
अख्खा मटकवलात
तेव्हाच मी तुमचं लक्षण
ओळखलं.

थँक्यू
निळ्या तळ्याच्या काठावरचा बगळा
एका अपुर-या चित्राला मदत करायला
काळ्या ढगाच्या दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याल्या 'थ्यंक्यु' म्हणालो.

पक्षनिष्ठा
पंचवीस मार्क कमी पडून नापास
झालेले चिरंजीव तिर्थरूपांना म्हणाले,
'मी पहिल्यापासूनच मार्क्सविरोधी गटात आहे.'

वटसावित्री : १
'वटेश्वरा, पुढल्या जन्मोजन्मी मला
'ह्यां' च्या समोरच्या बि-हाडातल्या
बाईच्या जन्माला घाल....'

वटसावित्री : २
'वटेश्वरा, हे
आज तुझ्या बुध्यांला गुंडळलेलं
सुत उद्या पहाटे मी
उलंटं फिरवून घरी परत नेणार आहे.
तेव्हा आजचं सुत हे एक नुसतचं
बंडल आहे हे ध्यानात ठेव.'

प्रश्न
आताशा बुडणा-या सुर्याला
'बराय उद्या भेटू'
असे म्हणाला की तो मला म्हणतो,
'कशावरून?
मधल्या रात्रीची
तुला अजूनही इतकी खात्री आहे?
'सुर्य आता म्हातारा झालाय.'

मी राहतो पुण्यात
मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या 'ठाण्या'त.
इथल्या मंडईचे देखील विद्यापिठ आहे.
आणि विद्यपीठाची मंडई झाली आहे.
बोलणे आ इथला धर्म आहे
आणि ऎकणे हा दानधर्म आहे.
म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि स्रोते उपकार करतात.
उपचारांना मात्रा जागा नाही.
कवीता फाडण्याच्या मंत्र
दोन टोके पानांची
दोन चिमटी बोटांच्या
एक कागद गाण्याच्या
दुसरे दिवशी वाण्याच्या
मोडा तोडा ओढा
एक दऊत फोडा
एक पाय खुर्चीचा
एक पाय टेबलाचा
दोन घाव घाला
कवी खाली आला
गाणे चोळामोळा
पावसात जाऊन खेळा!

एक होती ठम्माबाई 
एक होती ठम्माबाई
तिला सोशल वर्कची घाई
रात्रंदिवस हिंडत राही
पण वर्कच कुठे उरले नाही

वर्क थोडे बाया फार
प्रत्येकीच्या घरची कार
नोकर - शोफर - बेरा - कुक
घरात आंबून चालले सुख

घराबाहेर दुःख फार
करीन म्हणते हलका भार
कार घेऊन निघते रोज
हरेक दुःखावरती डोज -

पाजीन म्हणतेः पिणार कोण ?
सगळ्या जणींना करते फोन
'' मला कराल का हो मेंबर ?''
'' अय्या , सॉरी , राँग नंबर !''

'' सगळ्या मेल्या मारतात बंडल ''
म्हणून स्वतःच काढते ' मंडळ '!

मी केलेली 'पुलं'ची हजामत Mi Keleli PuLanchi Hajamat

हा लेख आहे पुलंच्या नाव्हयाचा... जगाची गंमत करणा-या या अवलियाची  हजामत या बहादुराने केली आहे. पण ही हजामतही त्यांच्यासाठी एका देवपूजेपेक्षा कमी नव्हती. या देवपूजेचे गोष्ट त्यांच्याच शब्दात... 
.......................................

सकाळी नऊ-साडेनऊची वेळ ;विद्यार्थी सहाय्यक समितीचा एकविद्यार्थी दुकानाचे दार घडून आत आला. ' तुम्हाला पु. ल. देशपांडे साहेबांचे केस कापण्यास बोलावले आहे. ' त्याच्या या वाक्याने माझ्या चेह - यावर उमटलेले शंकेचे भाव पाहून ' सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे केस कापावयाचे आहेत '- त्याने पुन्हा एकदा आपले वाक्य पूर्ण केले अन् समोर बसलेल्या गि-हाईकाचा कान माझ्या कात्रीत येता-येता वाचला. आश्चर्य आणि आनंद यांच्या धक्क्यातून सावरत मी त्याला ' हो लगेच निघतो ' असे म्हणालो आणि समोर बसलेल्या गि-हाईकाकडे आरशात पाहू लागलो. त्याच्या तोंडाचा झालेला चंबू मला स्पष्ट दिसत होता. ' पुलं ' चा निस्सिम भक्त असलेल्या त्या गि-हाईकाला माझ्या इतकाच आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसलेला होता. ' राहू द्या हो ; माझे राहिलेले केस नंतर कापा. मला काही घाई नाही. ' त्याच्या या वाक्यातून ' पुलं ' बद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त होत होते. तरीही त्यांना कसेबसे मार्गी लावून मी माझी हत्यारे गोळा करून बॅगेत भरली. त्या मुलाची अन् माझी ओळख सुप्रसिद्ध क्रिकेट महर्षी देवधरांच्या घरी केस कापावयास जात असे तेव्हापासून झालेली होती. त्यामुळे त्याने दिलेले हे निमंत्रण शंभर टक्के खरे असणार यावर माझा विश्वास होता.

(भाई)गीरी Bhaigiri Poem On Pu La Deshpande

अक्षरांची रत्ने खुलवत राजा होता अवतरलेला
गेली वर्षे सरली वर्षे दरवळ त्याचा पण उरलेला

राजा होता थोडा डांबिस थोडा अल्लड थोडा ग्यानी
ह्या राजाचा रुबाब होता एक मनोहरशी फ़ुलराणी

ह्या राजाची गोष्ट निराळी ह्या कुलुपाला नव्हती किल्ली
ह्या राजा दिसल्या होत्या काही व्यक्ती काही वल्ली

त्या वल्लीची बात निराळी नाथा,नंदा, अंतु बर्वा
ह्यातिल खरा नि खोटा कुठला तुम्हीच वाचा तुम्हीच ठरवा

ह्या राजाची कधी फ़सवणूक कधी उगाची खोगिरभरती
ह्या राजाने चालत न्हेले आम्हा तुम्हा चांळीं वरती

कधी जहाला धोंडो जोशी कधी बबडुचे लाडु वळतो
हया राजाचा थाट हे न्यारा ज्याला जुळतो त्याला कळतो

कधी असामी गुणगुणला तो कधी उगाचच शुन्य जहाला
ह्या राजाचा सुर गवसला ज्याला बस तो धन्य जहाला

-- मकरंद सखाराम सावंत

पाठीवरचा तो हात! Pathivaracha To Hat

"आले, आले बरं का!" गर्दीत कोणीतरी म्हणाले.
"कुठे आहेत, कुठे आहेत?" बरेच आवाज.
"ते काय, अँबेसिडर मधून उतरताहेत."
गुरुशर्टावर बिल्ले लावलेली काही स्वयंसेवक मंडळी पुढे सरसावत, "तुम्ही जरा बाजूला सरका हो, त्यांना यायला सुध्दा रस्ता नाहीये! नाहीतर असं करा ना, तुम्ही सगळे आत का नाही जाऊन बसत? ते तिथंच येणार आहेत."
कोणीही फारसं मनावर घेतलं नाही. ते स्वाभाविकच होतं.
सगळ्या गर्दीच्या टाचा उंच झाल्या! मिळेल तिथून पुढे घुसून, मान ताणून लोकांची त्यांना बघण्याची धडपड सुरु होती.
मलाही उत्सुकता होतीच पण हे सगळे लोक इतके पराकोटीचे उत्सुक होते की मी जरा भांबावलोच.
मी "बाबा, मलाही थोडं उंच करा ना!"
बाबांनी मला दोन्ही हातांना धरुन थोडं उचललं आणि ते मला दिसले! मंडळी, ते माझं पुलंचं साक्षात पहिलं दर्शन!!
१९८० चा सुमार असेल, मी आठवीत असावा. अहमदनगरच्या 'महावीर कलादालना'च्या उद् घाटन सोहळ्यासाठी पुलं आलेले होते.
नुकतीच त्यांची साठी झाली होती. 'पुलं एक साठवण' हे प्रकाशनपूर्व नोंदणी वगैरे करुन घरपोच आलेलं मला आठवत होतं.
(पोस्टातून घरपोच आलेल्या पार्सलातून कोरे पुस्तक बाहेर काढून, त्याच्या पानांचा छान वास घेत घेत आपण आधी न वाचताच ते घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून प्रथम आजोबांना द्यावे लागले होते हे ही लक्षात होते:)
तशी 'व्यक्ती आणि वल्ली', 'पूर्वरंग', 'अपूर्वाई' ह्या पुस्तकांची मोहिनी मनावर आरुढ होतच होती पण हे विख्यात साहित्यिक आहेत वगैरे कल्पनांना डोक्यात अजून स्थान नव्हते.

मम सुखाची ठेव! Mam Sukhachi Thev

महाराष्ट्राचे हे लाडके व्यक्तिमत्त्व ३५ वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आचरे गावात आपल्या ‘मैत्र जिवाचे’ अशा ७० कलावंतांना घेऊन माहेरपणाला गेले होते. त्यात होते- दस्तुरखुद्द पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, कुमार गंधर्व, वसुंधरा कोमकली, मालिनी राजूरकर, गोविंदराव पटवर्धन, नारायण पंडित, अशोक रानडे, एम. आर. आचरेकर, चिंचाळकर गुरुजी आदी मंडळी. पुलंचे ते माहेरपण म्हणजे आगळेवेगळे गंधर्व संमेलनच होते.
त्याची ही आठवण!
त्या १९७६ सालच्या आचरे गावच्या रामनवमीच्या दिवसाचे सारे वातावरणच ‘पुलमय’ होऊन गेले होते. पुलं आणि त्यांच्या परिवाराचा आचरे येथील सुखद सहवास आम्हा आचरेवासीयांच्या दृष्टीने ‘मर्मबंधातील ठेव’ ठरली होती, की जी आम्ही अजूनपर्यंत जपून ठेवली आहे. आज ३५ वर्षे झाली तरी त्या आठवणी मोगऱ्याच्या कळ्यांप्रमाणे टवटवीत आहेत.
त्याचे असे झाले, एके दिवशी आचरे गावचे सुपुत्र, पु.ल. देशपांडे यांचे स्नेही आणि सुप्रसिद्ध तबलापटू वसंतराव आचरेकर यांचे रामेश्वर देवस्थानचे तत्कालीन ट्रस्टी बाळासाहेब गुरव यांना एक पत्र आले. ‘या वर्षी रामेश्वर मंदिराचा त्रिशतसांवत्सारिक महोत्सव येत आहे. त्यानिमित्त पु.ल. देशपांडे, सुनीता वहिनी, कुमार गंधर्व आणि त्यांचा ७० जणांचा गोतावळा आचरे येथे मागारपणाला येत आहे. आपण रामनवमी उत्सवात गायन, वादनकला, साहित्य यांचे छोटेखानी संमेलनच भरवू.’

व्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे Vyakti ani Valli Ek Athavan By Atul Parchure

मी पु.लं.चा फॅन, चाहता. मला पु.लं.चं व्यक्ती आणि वल्ली पुस्तक पूर्ण पाठ. मी माझ्या वेगवेगळ्या नाटकात मग्न होतो. त्या काळात व्यक्ती आणि वल्ली रंगमंचावर आणण्याची चर्चा चालू होती. मला वाटलं त्यातल्या पु.लं.च्या भूमिकेसाठी विक्रम गोखले किंवा दिलीप प्रभावळकर यांच्यापैकी कोणाला तरी हा रोल मिळणार. मला या नाटकात रोल मिळेल असा मी विचारही केला नव्हता. आणि मला निर्मात्याचा फोन आला तू व्यक्ती आणि वल्लीमधील पु.लं.चा रोल करशील का? माझी पर्सनॅलिटी किंवा माझं बाह्य व्यक्तिमत्व तरुणपणच्या पु.लं. सारखं काहीसं तेव्हा होतं. मला विचारण्यापूर्वीच निर्मात्याने पु.लं. नाच विचारलं होतं की अतूल परचुऱ्यांना ही भूमिका द्यायची का? पु.ल. लगेच ’हो’ म्हणाले. त्यामुळे मी ही भूमिका करायला नकार देणं शक्यच नव्हतं. माझी पु.लं.शी ओळख नव्हती. आणि त्या काळात त्यांच्या आजारपणाला सुरुवात झाली होती. पण त्यांच्या विनोदबुद्धी तशीच तीव्र होती.

उत्स्फ़ूर्तता पुलंची!!! Pu Lanchi Utsfurtata by Sudhir Gadgil

नमस्कार,

’बोलणं’ नेमकं, नेटकं, समोरच्याला सहजतेनं समजेल असं असणं ही सध्याच्या मार्केटिंगच्या जगात अत्यावश्यक बाब ठरू पाहतीय. शब्द निवडीतली स्वाभाविकता, शब्द मांडणीतील अनौपचारिकता, विचारांची स्पष्टता आणि क्वचित प्रसंगी उत्स्फ़ूर्तता हे सूत्र सांभाळलं, तर कुठल्याही वयोगटातल्या, कुठल्याही स्वभवधर्माच्या माणसांशी तुमचे संवादाचे सूर सहज जमतात. ’पुलं’नाही अनौपचारिक बोलीत बोलण्याची भट्टी झक्क जमली होती.

"तुम्हाला सांगतो..."म्हणत ते क्षणात समोरच्यांच्या हृदयात शिरत. अंगभूत उत्स्फ़ूर्तता, बारीक निरिक्षणशक्ती आणि मूळात माणसांची आवड आणि त्यांच्या आनंदात आनंद मानण्याची उपजत वृत्ती यामुळे शब्दांच्या खेळाचे ते अनभिषिक्त सम्राट राह्यले. आपण मंडळी अनेकदा त्यांच्य उत्स्फ़ूर्त उद्गारांनी खदखदलेले आहात. मला ’पुलं’ समवेत प्रावास करण्याचाही योग आला आणि साध्या साध्या गोष्टीतही त्यांनी केलेल्या शेरबाजीमध्ये डोकावणा-या ’खट्याळ-मिष्किल’ पुलंचे दर्शन घडले.

पु.ल. एक आठवण Pu La Ek Athavan

फावल्या वेळात पुलं वाचत बसणं, हा माझा आवडता छंद आहे. मनाच्या आनंदी अवस्थेत पुलं वाचले तर आनंद शतगुणित होतो व दु:खी अवस्थेत वाचले, तर दु:खाची तीव्रता खूप कमी होते, असा माझा कित्येक वर्षांचा अनुभव आहे.
सतत गाण्याच्या मैफिलींचा आनंद घेणारा श्रोता कधी स्वत: गाऊन बघण्याचं धाडस करतो, तेव्हा आपण गवय्ये आहोत अशी फुशारकी त्याला अजिबात मारायची नसते. पण तरीही, एखाद्या वेळी त्याला राहावत नाही. आज पुलंबद्दल लिहिताना माझं असंच काहीसं झालंय..

पुलंच्या बाबतीत लिहिताना प्रश्न असा पडतो की, त्यांच्यावर लिहायचं ते कोणत्या बाबतीत?
सामाजिक बांधीलकीची जाण ठेवून लिहिणारा लेखक, स्वत:चं नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर लक्षावधी रुपयांचं दान निरनिराळ्या संस्थांना देणारा दाता, उत्तम नाटककार, संगीतकार, शास्त्रीय संगीताचा उत्तम जाणकार आणि गायकसुद्धा, अप्रतिम हार्मोनियम वादक, की सर्वश्रेष्ठ विनोदी लेखक..

पुलंची बायको PuLanchi Bayako

सुनीताबाई ग्रेट होत्या. त्यांनी आयुष्यभर वाईटपणा घेण्याचं धाडस केलं. चांगुलपणा सोपा असतो. तो बाजूला ठेवून जाणूनबुजून वाईटपणा घ्यायला, मोठं धाडस लागतं. पुलंच्या अंगभूत चांगुलपणाला बाईंच्या ‘खडूस’पणाचं संरक्षक कवच लाभलं म्हणून महाराष्ट्राचं ते अक्षरधन सुरक्षित राहिलं.

कोणी काही म्हणो, जनसामान्यांमध्ये सुनीताबाईंची प्रतिमा ‘पुलंची खडूस बायको’ अशीच होती.

सुजाण साहित्यरसिकांना सुनीताबाई या संवेदनशील लेखिका आणि उच्च अभिरुचीच्या आस्वादक म्हणून ठाऊक आहेत. पण, अशांची संख्या किती? पुलंसारख्या अष्टपैलू खेळियाचा चाहता असायला वाचक असण्याचीही गरज नव्हती. त्यांना ऐकणं-पाहणं पुरेसं होतं. साहजिकच त्यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा. त्यांच्या तुलनेत सुनीताबाईंचं लेखन आस्वादण्यासाठी आवश्यक प्रगल्भ, उच्च साहित्यिक अभिरुची लाभलेल्या रसिकांची संख्या किती असेल? त्यातही सुनीताबाईंचं सर्वात गाजलेलं पुस्तक होतं ‘आहे मनोहर तरी’. ते गाजलं ते त्यातल्या वादग्रस्ततेमुळे. ‘पुलंच्या बायको’ने जाहीरपणे पुलंची उणीदुणी काढली आहेत, याची मनुष्यसुलभ पण साहित्यिक निकषांवर कमअस्सल उत्सुकता त्यामागे होती. या पुस्तकाच्या ‘यशा’ने सुनीताबाईंच्या, तोवर एका उच्च वर्तुळात आणि सांगोवांगीत असलेल्या, ‘खडूस’पणावर शिक्कामोर्तब झालं..

'पुल'कित! PuLaKit

मुंबईला गोरेगाव येथे पूर्वेला आरे रस्त्याला लागून असलेला संत पायस कॉलेजचा परिसर म्हणजे हिरव्या वनराजीने विनटलेले एक उपवनच. या ठिकाणी कॅथॉलिक ख्रिस्ती धर्मगुरूंना प्रशिक्षण देणारे केंद्र आहे. अभ्यासाचा एक भाग म्हणून दर वर्षी इंग्लिश नाटक सादर केले जात असे. मराठी भाषक प्रशिक्षणार्थींच्या प्रयत्नांमुळे मराठी नाटकही सादर होऊ लागले. एके वर्षी आम्ही विद्यार्थ्यांनी "डॉ. कैलास' हे नाटक बसविले होते. या नाटकाच्या प्रयोगासाठी प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना निमंत्रित करावे, असे ठरले. भाईंना मी अधूनमधून पत्रे लिहीत असे. त्यांच्याकडून न चुकता उत्तर येत असे. त्यांना बोलावण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती.

तेव्हा भाई सांताक्रुझला राहत असत. आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो. भाई आणि सुनीताबाई यांनी आमचे आनंदाने स्वागत केले. आमच्या अभ्यासक्रमाबद्दल आणि जीवनाबद्दल त्यांनी जिव्हाळ्याने माहिती विचारली. मराठी भाषेवरील आमच्या प्रेमामुळे ते भारावून गेले व त्यांनी आमचे आमंत्रण स्वीकारले. आम्हा साऱ्यांना आनंद झाला.

आमचा सुसंस्कृत मित्र Aamacha Susanskrit Mitra

स्वतःच्या अगदी खास वेगळेपणानं मैत्र जपणारा एक पराकोटीचा सुसंस्कृत मित्र आम्हाला लाभला. स्वतःची थोरवी नेमकेपणानं ओळखूनही समोरच्या आम्हा दोघांसारख्या सामान्य माणसांसाठी पुढे केलेला मैत्रीचा हात पुलंनी कधीही आखडता तर घेतला नाहीच, पण आमच्या मुलांवरही ते माया करीत राहिले, एका मित्राच्या भूमिकेतूनच. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्या मैत्रीची याद तीव्र होतेय...

आता साठीच्या उंबरठ्यावरून माझ्या गतायुष्याकडे पाहू जाते तेव्हा वाटतं, देवाने अनेक गोष्टींबाबत माझ्या पदरात अवास्तव झुकतं माप टाकलंय. आयुष्यात मला अनेक मित्रमैत्रिणी लाभल्या हे त्यातलंच एक. कुणालाही हेवा वाटावा अशी ही आमची मित्रसंपदा. या सार्‍यांनी इथवर निरलसपणे सोबत केली. माझ्यावर खूप प्रेम केलं आणि वेळोवेळी माझं वाजवीपेक्षा कांकणभर जास्तच कौतुकही केलं. अशा या गोतावळ्यात स्वतःच्या अगदी खास वेगळेपणानं आमच्यातलं मैत्र जपणारा एक पराकोटीचा सुसंस्कृत मित्र या वाटचालीत आमच्या सोबतीला होता, त्याचं नाव होतं पु. ल. देशपांडे.

पुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर Pu La Kahi Athavani by Ram Kolhatkar

१९७२ साली भयंकर दुष्काळ पडला होता आणि शेवटी दुष्काळाच्या छायेतुन महाराष्ट्र सुटल्यानंतर जून १९७३ साली संपूर्ण महाराष्ट्र आनंदात होता आणिबाणीच्या जवळ देश चालला होता. पण तारणहार इंदिराजींवर १९७१च्या युद्धातील विजयाचा मद अजून होता. ‘गरिबी हटाव’ची सिंहगर्जना चालणार होती ती पुढे, पण याही परिस्थितीत अवर्षणग्रस्त महाराष्ट्र पावसामुळे सुखावला होता.

त्याकाळात दिवाळीत स्वत: तयार केलेली, छापलेली, कलात्मक नाविन्यपुर्ण अशी ग्रिटींग कार्डस्‌ सर्वजण प्रेमाने पाठवीत. परवडले न परवडली तरी! तेव्हा कुरिअरवाले म्हणजे पुण्यामुंबईत फिरणारे ऎकटे ‘प्रवसी’ होते. पण ते पुण्यामुंबई पुरते! आणि महाग!

आम्ही आमच्या ‘कैलास जीवन’ या आयुर्वैदीय औषधीच्या कंपनीची काही हजार ग्रिटिंग कार्डस्‌ छापली त्यावर मजकूर होता ‘धनांधकारेषु इव दीपदर्शनम्‌!’ (मॄच्छकटिक)

पु.ल. आंनदाचा निर्मळ झरा - Pu La Anandacha Nirmal Zara

प्रिय बालमित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या भाईबद्दल मी नवं काय लिहु? भाई हे आपलं `लाडक दैवत'होतं. कुणीही विद्यार्थी माझ्याकडे आला आणि त्यानं मला विचारलं, `सर, मला वाचनाची आवड निर्माण करायचीय कुठून सुरुवात करु?'
मी त्याना म्हणतो. `अपूर्वाही वाच-' बस्स. पु,लं.चे शब्द म्हणजे निर्मळ निळाईचा गोड झरा. आपले मन त्या झर्‍यात केव्हा भिजून रमून जाईल ते कळत नसे. लाखो मराठी मनाशी मैत्री साधण्यातच कसब पुलंना साधलं कसं? केवळ `प्रतिभा' हे त्याचं उत्तर नाही. प्रतिभा अनेकांना असते. पण पु.लं. आवडलं याच महत्वाच कारण त्यांचा मधाळ स्वभाव.
समाजातल्या कुठल्याही थरातला माणूस असो - पु,लं. त्याच्याशी दोस्ती करायचे. माणसाला `माणूस'च मानायचे. एखाद्या थोर राजकीय पुढार्‍यांशी जसं प्रेमानं वागणे, एखाद्या वसंतरावासारख्या थोर गवयाशी जशी मैत्री, तशीच मैत्री कोपर्‍यावरच्या पानवाल्याशी. ते पहायचे रसिकता, ते पहायचे त्याचं जीवनावरच प्रेम, ते पहायचे त्या व्यक्तीतली निरागसता! शाळकरी मुलगा असो की ऐंशीवर्षाचा ज्येष्ठ नागरिक पु.लं. दोघांशी ही सारख्याच तन्मयतेने बोलायचे, त्यांच्या पत्राला उत्तर द्यायचे.

पुलदैवत PuLaDaivat

साल आहे १९५६. माहीम कोळीवाडय़ाची वस्ती.. कोळ्यांच्या एका दुमजली घरात तळमजल्यावरच्या ४ खोल्यांत भाडेकरू.. त्यातल्या एका खोलीतल्या खिडकीच्या चौकटीत गजाला धरून ५ वर्षांचा मुलगा (अस्मादिक) मजेत बसलाय. घरमालकांच्या रेडिओवर गाणं लागतं.. ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनांत, नाच रे मोरा नाच..’ मी खिडकीत उभा राहून पायाने ठेका धरतो.. मला अत्यंत आवडलेलं असं ते पहिलं-वहिलं गाणं. पुढे काही वर्षांनी त्यातला आशाताईंचा मयूरपंखी, मखमली आवाज दाट ओळखीचा झाला. या गाण्यावर सुरांचं मोरपीस फिरविणाऱ्या जादुगाराशी दोस्ती व्हायला आणखी काही पावसाळे सरले. पुलंची पहिलीवहिली भेट, अशी मला नकळत त्यांच्या सुरेल सुरावटीतून झाली.. आणि पुलं भेटत राहिले, वेगवेगळ्या रुपात बहुरूप्यासारखे.. तुडुंब आनंद देत राहिले, वेगवेगळ्या स्वरूपात खेळियासारखे..

आठवणींच पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई Athavanich Pimpalpan

काल पु.लंची जंयती आणि त्याच्या एक दिवस आधी सुनीताबाईंच्या जाण्याने अवघे साहित्यविश्व हळहळले. वरुन कडक शिस्तीच्या आणि करारी व्यक्तिमत्वाच्या पण आतुन मृदू स्वभावाच्या सुनीताबाई ‘आहे मनोहर तरी...’ नंतर केवळ पुलंच्या पत्नी म्हणून नव्हे तर एक उत्तम सिद्धहस्त लेखिका म्हणून साहित्यविश्वाला समजल्या. पु.लंच्या जडणघडणीतही त्यांचा वाटा मोठा आहे. आम्हा वाचकांना पु.ल. आणि सुनिताबाई त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातुन आणि थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या आठवणीतून उमजले, भावले. पु.ल. आणि सुनीताबाईंच्या प्रेमळ सहवासाने पावन झालेल्या थोरांनी त्यांच्याविषयी सांगितलेल्या काही आठवणी....

जे रम्य ते बघुनिया...Je Ramya Te Baghuniya

(श्री ना. ध. महानोर लिखीत ‘आनंदयोगी पु.ल.’ ह्या पुस्तकातील श्री निशिकांत ठकार ह्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही भाग.)

....शहरात राहणार्‍या मध्यमवर्गीय माणसाचे वावर हरवलेले आहे. शेताकडे वावरण्याच्या त्याच्या वाटा बंद झालेल्या आहेत. त्यांच्या शोध तो साहित्यातून-कवितेतून घेऊ पाहतो. रानातल्या कवितांचा अस्सलपणा पु.लं.ना पळसखेडला जायची प्रेरणा देतो. खरं तर जीवनाच्या आणि विशेषत: कलेच्या, सर्वच क्षेत्रांतल्या आणि पारदर्शी, सुंदर आणि रमणीय अनुभवांचा शोध घेत पु.लं. नी आपलं व्यक्तिमत्व समृद्ध, सुजाण आणि सुस्कृंत केलं. एका चांगल्या अर्थानं हा एक वेडा माणूस होता. जे रम्य आहे ते बघून त्याला वेड लागायचे. जे रम्य नाही ते बघून त्याच्यावर वेडं व्हायची पाळी यायची तेव्हा तो विनोद करायचा. रम्य म्हणजे नुसते मनोहर नाही. ते तर आहेच, पण त्या सौंदर्यबोधात माणुसकीचा आणि सर्जनाचा साक्षात्कारही त्याला हवा असायचा. त्यामुळेच हा रसिकोत्तम कलावंत कलाप्रेमी होता तसाच माणुसप्रेमीही होता. जिथे काही रचनात्मक चालले असेल तिथे त्याचा ओढा असायचा. रचनात्मकतेत सर्जनात्मकतेचा प्रत्यय आला तर तो त्याच्यावर जीव ओवाळून टाकायचा. हा भावबोध अर्थपुर्ण करण्याचे काम सुनीताबाई करायच्या. ही भाईंची इच्छा म्हणून मम म्हणायच्या. महानोरांनी असे प्रसंग अनुभवले. ’जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे’ ये पु.लं. च्या आयुष्याचे ब्रीद महानोरांनी नेमके हेरले. पु.लं. बरोबर घालवलेल्या क्षणांत हाच आनंद भरून राहिलेला त्यांनी अनुभवला त्याला निर्मळ हास्यविनोदाचा सुंगध लाभलेला होता. पु.लंच्या रम्यतेच्या कल्पनेत सौंदर्यबोध आहे तशीच एक नैतीकताही आहे. त्यामुळेच ते संस्कृतीच्या विविधतेचे महत्व मानतात. देव न मानणारे पु.ल. नास्तिक वाटत नाहीत कारण त्यांनी शिवत्व स्विकारलेले आहे. त्यांना सर्वोत्तमाचे वेड आहे. देव नाही पण बालगंधर्व चार्ली चॅपलीन, रविंद्रनाथ यांसारखी दैवते ते मानतात आणि महानोरांसारख्या विवीध क्षेत्रांतल्या विवीध प्रतिभांचे स्वागत व कौतुक करतात. ते मुळातच बहुवचनी आहेत. त्याशीवाय संस्कृतीची वाढ होत नाही. जे आहे त्यापेक्षा जग चांगले व्हावे, सर्जनशील व्हावे, मानविय व्हावे ही त्यांची नैतीकता आहे.

आमचा हसवणारा मित्र पी. एल. Amacha Hasavnara Mitra P L

आमचा हसवणारा मित्र..

(अस्मिताताई बाविस्कर आणि आनंद कुलकर्णी यांचे ह्या लेखासाठी खुप खुप आभार.)

पु लंना "पी. एल." म्हणणाऱ्यांच्या पिढीतला मी आहे. कारण माझी त्यांची ओळख साठ वर्षांपासूनची- म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालयापासूनची. त्यांच्या खट्याळपणाच्या, महाविद्यालयात नव्याने आलेल्या मुलांची खिल्ली उडवण्याच्या, उत्स्फूर्त विनोदाच्या अशा कितीतरी आठवणी मनात दाटून आल्या आहेत. वयोमानाप्रमाणे जशा आठवतील तशा थोड्याशा सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

सुरवातीला त्यांच्या उत्स्फूर्त विनोदाचा एक नमुना देत आहे. सवाई गंधर्व महोत्सव सुरू झाल्यापासून मी आर्य संगीत प्रसारक मंडळाचा कमिटी मेंबर आहे. प्रसंग होता सवाई गंधर्वांचा पुतळा संभाजी पार्कमध्ये बसवला त्या वेळचा. कार्यक्रमानंतर काही निवडक लोकांना सहसचिव डॉ. नानासाहेब देशपांडे यांच्या "आलापिनी' बंगल्यावर जेवण होते.

पु.लं. च्या आठवणींना उजाळा Pu La Chya Aathavaninna Ujala

'मराठी वाचकांना आणि प्रेक्षकांना आपल्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे पाहायला लावणारा, नव्याचा स्विकार निखळपणे करायला शिकविणारा, सामान्यातील असामान्यत्व हुडकणारा माणुस म्हणजे पु.ल.देशपांडे आणि अशा या भल्या माणसाच्या आनंदोत्सावात आपण सहभागी होतो, याबद्दल स्वत:चाच हेवा वाटतो.’ पु.लं.च्या आठवणी सांगताना विजयाबाई अक्षरश: हरवुन गेल्या होत्या. जबरदस्त मित्रवर्ग लाभलेला ’अवलिया’ पण भला माणूस असलेल्या पु.लं.ना कायम आपला म्हणून जो अनुभव आहे, तो इतरांनाही जाणवून देण्याचा ध्यास होता. त्यामुळेच त्यांचा विनोद आणि लिखाण हे दोन्ही आयुष्यभर आपल्याकडे ठेवणीतला साठा जपून ठेवावा तसे टिकून आहेत. एवढेच नव्हे तर पु.लं.चे लिखाण वाचताना नकळत ते आपल्याशी संवाद साधत असल्याचा भास होतो. पु.लं.च्या सान्निध्यात असताना, या माणसाकडे अशी कोणती जादू आहे!’. याचं कायम अप्रूप वाटत असं सांगताना विजयाबाईंनी भावनाविवश होत पु.लं.ची एखाद्याचं कौतुक करण्याची अगर प्रोत्साहन देण्याची हुबेहुब नक्कल करुन दाखवीली, त्या वेळी प्रेक्षकही गहिवरले होते.

भाईकाका BhaiKaka


महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु.ल. देशपांडे यांनी आपले भाचे दिनेश ठाकूर तथा दिनूवर 'गणगोत' या व्यक्तिचित्रात्मक पुस्तकात एक नितांतसुंदर लेख लिहिला आहे.
१९ मे १९६६ रोजी दिनूला हे पुस्तक भेट देताना त्यांनी लिहीलं होतं...
त्यास स्मरुन अमेरिकास्थित दिनेश ठाकूर यांनी आपल्या भाईकाकांवर हा ह्र्दयस्पर्शी लेख...

भाईकाका जाऊन आता आठ वर्षे होतील. पण त्यांच्या आठवणींची, नावाची नशा काही उतरत नाही. आजही भाईकाकांची पुस्तके वाचताना, टेप्स ऎकताना ते माझ्याशीच बोलताहेत, संवाद साधत आहेत, असे वाटत राहते. आणि कुठच्याही प्रसंगी त्या संदर्भातले भाईकाकांचे प्रसन्न व्हायला होते.... आठवणीत रंगून जायला होते. हिच स्थिती भाईकाकांचा सहवास लाभलेल्या अनेकांची आहे.
नवल म्हणजे भाईकाका गेले तेव्हा आशुतोष आठ-साडेआठ वर्षाचाच होता, पण त्याचीही तीच स्थिती आहे. शाळेतून घरी आल्यावर किंवा शनिवार-रविवारी 'असा मी..', 'बटाट्याची चाळ' , 'वाऱ्यावरची वरात' , 'बोरकर कवितावाचन'ची कायम पारायणे चाललेली असतात.

परफॉर्मर ’पुलं’ ! Performer PuLa

लिहीतानाही बोलण्याप्रमाणेच ते सहज असत. अकारण शब्दांची आतषबाजी नाही. लिहितानाही वृत्तीतला - मनातला 'परफॉर्मर' सतत जागा असे. नुसता त्यांचा 'आवाज -आवाज' लेख वाचला तरी वाचणाऱ्याला 'ऎकत' असल्याचा अनुभव यावा, अशी शब्दांची रचना. बर्वेला 'अंतू बर्वा' उच्चारून ते वाचकाला क्षणात कोकणात घेऊन जात.

पु.ल. देशपांडे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त खास लेख शब्दांच्या निवडीतलं नेमकेपण, सोप्पेपण, शब्द मांडणीतली अनौपचारिकता, भरजरी अलंकारिक शब्दांना दिलेला फाटा आणि 'नादा' मधला जिव्हाळा, या गोष्टी 'पुलं'ना ऎकताना आवर्जून जाणवत असत. भरड्या खादिच्या नेहरु शर्टाची बाही सरसावत 'तुम्हाला सांगतो' म्हण त्यांनी केलेलं भाषण असो, पॅंट-बुशकोटातल्या 'पुलं'चं, सिगारेटचा झुरका घेत कोचावर शेजारी बसलेल्याशी चाललेल्या गप्पा असोत किंवा 'एनसीपीए'त भावसंगीताचा प्रवास ते मांडत असताना, त्यांचं चाललेलं निवेदन असो, माझं लक्ष त्यांच्या शब्दमांडणीकडेच सतत असे. भाषण असो वा मुलाखत, त्यांच बोलणं गप्पा मारल्यासारखं असायचं, घरात बोलताना पुढचं वाक्य सहज सुचत जावं तसं. त्यातलं साधेपण मनाला भिडायचं. 'पु.ल.'च्या आवाजात , त्या नादात, तुमच्या -आमच्या विषयीचं प्रेम जाणवायचं, एखाद्याचं उत्स्फूर्त वाक्यानं स्टेजवर चैतन्य निर्माण करण्याची क्षमता त्यांच्या बोलण्यात होती.

नवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई Jhapatalelya Lekhanitale Bhai

महाराष्ट्र टाईम्स १२ जुन २००८

आज पुलंही नाहीत आणि प्रमोद नवलकरही... पण नवलकर नावाच्या भटक्याने त्यांच्या ' झपाटलेल्या लेखणी ' ने केलेले हे ' पुल ' वर्णन..

..................................

मराठी माणसाच्या मनात पु.ल. देशपांडेंच्या एवढ्या आठवणी आहेत की त्या कदापि पुसल्या जाणार नाहीत. पु.लं.नी माणसाच्या सर्व अंगांना केवळ स्पर्श केला नाही तर ते उराशी बाळगून त्याला आंजारलं , गोंजारलं. म्हणून महाराष्ट्राच्या तीन पिढ्यांना बंधुप्रेम देणारे ' भाई ' लाभले.

जो त्यांच्या सहवासात आला तो त्यांच्या सावलीत सुखावला. ज्यांना त्यांचा सहवास लाभला नाही त्यांनी केवळ त्यांची आठवण काढून भरभरून आनंद घेतला असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे उद्या संशोधकांची डोकेदुखी ठरणार आहे. हा माणूस कोणत्या रसायनाने घडवला गेला होता याचा शोध घेणं वैज्ञानिकांना अवघड जाणार आहे.

नटराजाचा लाडोबा Natrajacha Ladoba

चित्रपट व्यवसायाबद्दल सगळ्यांनाच कुतुहल असते. मी आणि माझा धाकटा भाऊ यशवंत, आणी ही गल्लीच्या न्यु एंजिनीयरींग कॉलेजात १९४८ मध्ये दाखल झालो. तेव्हा तर आम्हाला ’प्रभात’च्या वलयाची पार्श्र्वभूमी होती. सहाजीकच कॉलेजच्या वस्तीगृहात आमच्याविषयीचे औत्सुक्य होते. प्रत्यक्षात आम्ही लेंगा, शर्ट, कोट अशा वेशात गेलो आणि सर्वांमध्ये मिसळून गेलो.

त्यावर्षी प्रसिध्द लेखक पु.ल. देशपांडे एम. ए. शिकण्यासाठी विलिग्टंन कॉलेजात येणार असल्याची बातमी समजली. त्यांच्या विषयी आमच्या मनात वेगळीच प्रतीमा होती. पण तिला छेद देत ढगळ सदरा-पायजमा, पायात चप्पल अशा थाटात पु.ल. दाखल झाले. तेव्हा ’पु.ल.’ पेक्षा दामले बरे असे म्हणायची पाळी त्यांच्यावर आली. आमच्या अंगावर कोट तरी होते.

प्रभात कंपीनीमुळे पु.ल. ची आणि आमची चांगली ओळख होती.आता तिचे मैत्रीत रुपांतर झाले. पु.ल ना विश्रामबागेत खरं तर शांतता मिळत होती. चाहत्यांच्या गराड्यात जखडले जात नव्हते.

कोल्हापुरात १९३३ साली साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनात आचार्य अत्रे, गिरीश, यशवंत, सोपान देव चौधरी, संजीवनी मराठे, मायदेव या कवींनी भाग घेतला होता. स्टुडीओत निम्मीत करुन त्याच्या काव्यरचनांचे त्यांच्या आवाजात चिकीरण करण्यात आले होते. त्यावेळी कवी गिरीश यांनी आपली सुप्रसीध्द कवीता "न्यारीचा टाकु त होईल...मैतरणी बिगी बिगी चल" सादर केली होती. कवि गिरीश यांच्या बंगला विश्रामबागेत होता. पु.ल. च्या बरोबर आम्ही सुध्दा गिरीशांकडे गप्पा मारायला जायचो. कवींचा पु.ल. वर फार जीव होता. पु.ल. मुळेच या थोर कवींचा सहवास आम्हाला लाभला.

आम्ही अनेकदा संध्याकाळी सांगली-मिरजला फिरायाला जात असू. परतण्यास उशीर होऊन विश्रामबागला जाणारी शेवटची गाडी कधीकधी चुकायची. त्या उतररी पु.लं. ची मैफल असायची. पु.लं. च्या सहवासात आम्ही विश्रामबाग स्टेशनच्या प्लेटफॉर्म वर रात्र जागवत असू. त्यावेळी नकला, गाणी, विनोदी कथा, प्रसंग यांची रेलचेल होत असे. यातुन पु.ल. च्या विवीध कलापैलुंच बहुरुपी दर्शन आम्हाला घडे. किती भाग्यवान आम्ही! त्यावेळी यासर्व गोष्टीचा आनंद घेत वर्ष संपले. आम्ही पुण्याला परतलो. पुण्यात आल्यावर प्रभात स्टुडीओत पु.ल. च्या गाठीभेटी होत राहिल्या.

खुप वर्षानंतर नुकताच सांगलीला गेलो होतो. विश्रामबागेत स्टेशनची भग्न अवस्था पाहून डोळ्यात पाणी उभे राहिले. लेखन, अभिनय, संगीत, वक्तृत्व वगैरे कितीतरी कला पु.ल. ना अवगत होत्या. भरुनभरुन मिळाल्या. नुर्त्यकला द्यावी अशी नटराजाची इच्छा असेल. पण एवढं ओझ त्यांच्यावर लादु नका, असा सला पर्वती देवींनी दिला असणार. तरी पु.ल. नी स्वतंत्र न नाचता, आपल्या चित्रपट गिताच्या तालावर अनेक चित्रपट तारे-तारकांना नाचवले. एवढ भरभरुन देऊन सुद्धा देव समाधानी नव्हता. सुनीतावहीनी ही शक्ती त्यांच्यामागे उभी केली. अर्धनारी नटेश्वराचे मनोहरी रुप साकार झाले.

नटराजाचा लाडोबा त्यांच्याच आज्ञेवरुन कैलासाकडे रवाना झाला आहे.
--पंडीत दामले

देणाऱ्या हातांचे पुल! Denarya Hatache PuLa

'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' अशा यथार्थ शब्दात गौरविलेल्या पु. ल. देशपांडे यांची १२ जून ला पुण्यतिथी असते. आता पुल आपल्यात नाहीत , ही जाणीव मन विषण्ण करणारी असली तरी पुलंचे स्मरण झाल्याबरोबर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात त्यांची एखादी तरी विशिष्ट आठवण चटकन जागी होते. कधी पुलंनी केलेली एखादी कोटी आठवते , कधी त्यांच्या नाटकातील वा चित्रपटातील एखादा खुसखुशीत संवाद आठवतो , तर कधी त्यांच्या एखाद्या लेखातील गमतीदार वाक्य आठवते. पुलंनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा मराठी साहित्यात अजरामर आहेत.

त्यांचा ' काकाजी ', त्यांचे ' चितळे मास्तर ', त्यांचा ' नारायण ' हे सगळे थोड्याफार प्रमाणात आपल्याला आजूबाजूच्या जगात वावरताना दिसतात. पुलंनी निर्माण केलेले वाक्प्रचार मराठी भाषेत रुढ झालेले आहेत. '' तुला शिकवीन चांगलाच धडा '' हे ' ती फुलराणी ' मधील स्वगतातील उद्गार कधी गमतीत तर कधी रागात अनेकदा उच्चारले जातात. आतातर ते चित्रपटाच्या नावानेही विभुषित झाले आहे. मराठी भाषेची विविध रूपे आणि ती भाषा बोलताना प्रांतपरत्वे होणारे बदल पुल जेवढ्या बारकाव्याने दाखवत तेवढे बदल कोणी क्वचितच दाखविले असतील. पुल हे साहित्यसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट होते , याबद्दल वादच नाही. इतके अष्टपैलू व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात आजवर झाले नाही. पुल लेखक होते , कवी होते , संगीत दिग्दर्शक होते , नट होते , वक्ते होते.

पु. ल. नावाचे गारुड Pu La Navache Garud

पु. ल. गेल्यावर आमचा कलकत्त्याचा समीक्षक मित्र शमिक बॅनर्जी पुण्यात आला होता त्याने ही आठवण सांगितली. पु. ल. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचे पाच वर्षे मानद उपाध्यक्ष होते. एका बैठकीनंतरच्या भोजनोत्तर मैफलीत एक प्रसिद्ध नाटककार खूप सात्विक संतापले होते. त्यांना न विचारता त्यांच्या नाटकांचे कोणी अन्य भाषेत प्रयोग केले होते. त्यामुळे कॉपीराईटचा भंग होतो असा प्रकार होता. त्यांची अनेकांनी समजूत घातली पण त्यांचा राग धुमसत होताच. वाद वाढल्यावर पु. ल. तेथे असलेली हार्मोनियम काढून म्हणाले, मी आता तुम्हाला माझा प्रयोग करुन दाखवतो. त्याचा मात्र कॉपीराईट कोणाकडे नाही. कोणीही हा प्रयोग गावोगाव कोणत्याही भाषेत करावा, असे म्हणून पु. लं.नी हार्मोनियम वाजवणे सुरु केले. जरा रंग भरल्यावर ते आलाप आणि ताना घेऊ लागले. त्याला अर्थातच अभिनयाची जोड होती. पण एकही शब्द नव्हता. नंतर सर्वांच्या लक्षात येऊ लागले की आलापी आणि तानांमधून एक तरुण आपल्या प्रेयसीकडे प्रेमयाचना करतो आहे, तानांमधून ती तरुणी लाजते आहे. मग ताना मारीत त्यांचे प्रेम चालते. मग दोघांचे ताना आणि आलापीमधून लग्न होते. ताना मारीत बाळंतपण होते. मग भांडण... पुन्हा ताना... पुन्हा प्रेम जमते. ताना मारीत संसार फुलतो असा मामला पु. लं.नी एकही शब्द न उच्चारता केवळ ताना आणि आलापीमधून अर्धा तास जिवंत केला. समोरचे सगळे गडाबडा लोळायचे तेवढे राहिले होते. शमिक म्हणाला, 'कोणतीही तयारी, पूर्वसूचना नसताना हा माणूस इतका चोख परफॉर्मन्स देत असेल तर त्यांचे परफॉर्मन्स विषयीचे चिंतन किती परिपक्व असेल? ह्या माणसाभोवती महाराष्ट्राचे सांस्कृतिक जग केंद्रित का होते, ह्याचे जणू उत्तरच पु. लं.नी आम्हाला त्या अर्ध्या तासात दिले. '

- श्री. सतीश आळेकर (पु. ल. नावाचे गारुड)

गोष्टीरूपं पु.लं. GoshteeRupee PuLa

दादरच्या एका हायस्कूलमध्ये एक शिक्षिका क्लासरुममध्ये पुस्तक वाचण्यात गढून गेल्या होत्या सकाळचे साडेनऊ वाजत आले होते. शाळ सुरू व्हायला अजुन बराच वेळ होता. नेहमीप्रमाणे घरकाम आटोपुन त्या लगेच शाळेत येत व क्लासरुममध्ये निवातंवाचन करीत. शाळा साडेदहाला सुरु होत असल्यामुळे त्यानां वाचन करायला भरपुर वेळ मिळत असे.

नेहमी प्रमाणे आज वाचन करीत असताना त्याचां कानावर पावलांचा आवाज एकु आला. मान थोडी वर करीत त्यांनी पाहीले तर नीलम त्याचांकडे येत होती.
"नमस्तेमॅडम! येऊ का?" नीलमने भीतभीतच विचारले "ये, ये, बसना आज तू लवकर कशी आलीस? शाळा भरायला अजून बराच वेळ आहे बघ."

पु. लं. - अखेरचा अध्याय Akheracha Adhyay

पु. लं. च्या अखेरच्या प्रवासाबद्दलचा एक सुरेख लेख दै. लोकसत्तेत श्री. कुमार जावडेकरांनी लिहिला होता. पु. लं. च्या शैलीची पदोपदी आठवण करून देणारा हा लेख --

पु. लं. - अखेरचा अध्याय

'हॉस्पिटल' हा शब्द ऐकला की माझ्या काळजाचा (की हृदयाचा?) ठोका चुकतो. त्यामुळे डॉक्टरांनाही मी आजारी असल्याचं घोषित करणं सोपं जातं... साध्या डासाच्या रक्तानंदेखील मला गरगरतं. पूर्वी एस. टी. च्या मोटारीखाली आलेली म्हैस बघण्यासाठी पुढे सरसावलेला मी रक्ताचा ओघळ पाहून मागे परतलो होतो... हॉस्पिटलमधे जायचे प्रसंगही तसे माझ्यावर कमीच आले. नाही म्हणायला आमच्याकडे 'दुष्यंत' नावाचा कुत्रा जेव्हा होता, तेव्हा त्यानं केलेल्या स्वागतात सापडलेल्या पाहुण्यांना भेटायला (संबंध बिघडू नयेत म्हणून) मी हॉस्पिटलमधे गेलो होतो!

महाराष्ट्राचा व्हॅलेंटाईन Maharashtracha Valentine


'प्रेमदिना'निमित्त सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख. प्रवीण टोकेकर
अर्थात दस्तूरखुद्द 'ब्रिटिश नंदीं'नी लिहिलेला. पु.लं. - सुनीताबाईंचं नातं
इतक्या हळुवारपणे सांगणाऱ्या त्यांच्या शब्दांना कुर्निसात!................


उन्हाचा झळझळीत पट्टा इथं आतपर्य़त येतो. खूप वॆळ त्याच्याकडे बघितलं,की डोळे दुखतात थोडेसे चालायचंच. समोर रस्त्यावरच्या वर्दळीकडे भाईकाका टकटक बघत राहिले. रोज सकाळी अंघोळ किंवा स्पंजीग आटोपलं, की कुणीतरी त्यांना इथं आणून बसवतं. कुणीतरी म्हणजे बहुधा माईच. या खिडकीशी बसायचं आणि चिटकुला ब्रेकफास्ट करायचा. कितीही बेचव असला, तरी भाईकाका तो ऎन्जाय करायचे. हळूहळू त्यात पाखरांची किलबिल ऎकायची. द्र्ष्टीशेपात येणारा झाड्झाडोरा आनंदी वृत्तीन न्याहाळायचा. एखादी झकासशी टेप लावून देऊन माई आपल्या कामात बुडून जायच्या. भाईकाकांचे खरपुड्लेले पाय तबल्याच्या ठेक्यानिशी किंचित हलत, तेव्हा खुप सुंदर वाटतं .......

पुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर PuLaKit Sandhyakal

(स्मिता मनोहर आणि मनोज प्रभू यांनी श्री.उमाकांत व रमाकांत देशपांडे यांची घेतलेली मुलाखत - दि. ४ जून २००२)

'५, अजमल रोड, त्र्यंबक सदन'.... पार्ल्यात पोहोचलो आणि 'त्र्यंबक सदना'च्या दिशेनी आम्ही भारावल्यासारखे चालू लागलो. गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न.....पु.लं.च्या घरी जायचं... जे कदाचित स्वप्नच राहिल असं वाटत होतं, ते आज पूर्ण होत असल्याचा आनंद, बरीचशी उत्सुकता, पण एक हुरहुर अशा संमिश्र भावना मनात दाटून येत होत्या. पु.लं.चं बालपण, त्यानंतरचं समृध्द जीवन याच्या अनेक वर्षांच्या आठवणी जिथे दडल्या आहेत, तिथे आम्ही आज जात होतो, पण पु.ल. नसतांना. पु.ल. आज पार्ल्याचाच काय पण या जगाचाच निरोप घेऊन गेल्यानंतर आज त्र्यंबक सदन कसं असेल?.... अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा योग यावा, पण प्रत्यक्ष परमेश्वरानी त्याआधीच तिथून आपला मुक्काम कायमचा हलवावा, अशा वेळी भक्ताची जी अवस्था होईल ती अनुभवत मी आणि मनोज गेट जवळ पोहोचलो.

पुलंचं देणं Pu La

' पुलं'चं लिखाण, त्यांचे परफॉर्मन्सेस आजही अनेकांना आनंद देतात, क्षणभर का होईना त्यांच्या निखळ विनोदातून जगण्यातल्या दैनंदिन विवंचनांचा विसर पडतो... 'पुलं'च्या या मोठेपणाची जाणीव मराठीतून एमए करूनही केशकर्तनाचा व्यवसाय करणाऱ्या या लेखकाला आहे. म्हणूनच कामाच्या निमित्ताने त्यांचा 'पुलं' आणि सुनिताबाईंशी जो काही संबंध आला, ती त्यांना त्यांच्या आयुष्यातील फार मोलाची कमाई वाटते. त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात, निमित्त पुलंच्या नुकत्यात पार पडलेल्या जयंतीचं...

सकाळी नऊ-साडेनऊची वेळ; विद्याथीर् सहाय्यक समितीचा एक विद्याथीर् दुकानाचे दार उघडून आत आला. 'तुम्हाला पु. ल. देशपांडे साहेबांचे केस कापण्यास बोलावले आहे.' -त्याच्या या वाक्याने माझ्या चेहऱ्यावर उमटलेले शंकेचे भाव पाहून 'सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे केस कापावयाचे आहेत'- त्याने पुन्हा एकदा आपले वाक्य पूर्ण केले अन् समोर बसलेल्या गिऱ्हाईकाचा कान माझ्या कात्रीत येता-येता वाचला. आश्चर्य आणि आनंद यांच्या धक्क्यातून सावरत मी त्याला 'हो लगेच निघतो' असे म्हणालो आणि समोर बसलेल्या गिऱ्हाईकाकडे आरशात पाहू लागलो. त्याच्या तोंडाचा झालेला चंबू मला स्पष्ट दिसत होता. 'पुलं'चा निस्सिम भक्त असलेल्या त्या गिऱ्हाईकाला माझ्या इतकाच आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसलेला होता. 'राहू द्या होे; माझे राहिलेले केस नंतर कापा. मला काही घाई नाही.' त्याच्या या वाक्यातून 'पुलं'बद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त होत होते. तरीही त्यांना कसेबसे मागीर् लावून मी माझी हत्यारे गोळा करून बॅगेत भरली. त्या मुलाची अन् माझी ओळख सुप्रसिद्ध क्रिकेट महषिर् देवधरांच्या घरी केस कापावयास जात असे तेव्हापासून झालेली होती. त्यामुळे त्याने दिलेले हे निमंत्रण शंभर टक्के खरे असणार यावर माझा विश्वास होता.

पुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले "पु. ल.' Punha Bhetale Pu La

"पुलंच्या घरी गेल्यावर त्यांनीच दार उघडलं आणि चक्क मला ओळखलं. त्यामुळे मी पैज जिंकलो...' विलेपार्ले येथे राहणारे रत्नाकर खरे ही गोष्ट सांगू लागले आणि त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून "पु. ल." पुन्हा भेटले! ........

"पु. लं.'च्या आयुष्यातील महत्त्वाचे दिवस पार्ल्यात गेले. या दिवसांत पुलंच्या बरोबर वावरलेल्या काही जवळच्या कुटुंबांपैकी एक खरे कुटुंबीय. त्यापैकी रत्नाकर खरे यांना "पु. लं.' विषयी विचारले असता त्यांनी सांगितले, "

साहित्यपुरुषोत्तम Sahityapurushottam

काही विशिष्ट प्रदेशांच्या आणि राष्ट्रांच्या जीवनात काही भाग्ययोग येतात. तेथील जीवनसंचिताचा आविष्कार करणारे प्रतिभावंत साहित्यिक, चित्रकार, नट, गायक आणि प्रज्ञावंत त्यांना लाभत असतात. बंगालला रवींद्रनाथ आणि शरच्चंद्रांच्या रूपाने थोर साहित्यिक लाभले. प्रदेशाची सीमा ओलांडून ते साऱ्या भारतवर्षाचे रवीचंद्र ठरले. मानबिंदू ठरले. त्यांचा भारतीय मनावरील प्रभाव, परिणाम आणि संस्कार सर्वज्ञात आहे.

मुंबई…पुलंच्या आठवणीतली! Mumbai by Pu La Deshpande

मुंबईत गावदेवीतल्या एका चाळीत झालेला असला तरी मी वाढलो पार्ल्यासारख्या मुंबईच्या उपनगरात. या उपनगरी मुंबईने मला खूप काही दिले. मुख्यत: चाळीत दुर्लक्ष असलेली मोकळी हवा दिली. खेळायला मोकळी शेते दिली. पावसाळयात तिथे काकड्या ,पडवळ , दोडक्यांचे मळे फुलायचे.
गिरगावातच राहिलो असतो तर बैलांनी ओढलेले नांगर बैलगाडी- वर लादलेल्या काकड्यांच्या राशी पाहायला मिळाल्या नसत्या. ट्रॅमवाली मुंबई आणि आमची उपनगरी मुंबई यात खूप फरक होता. आमच्या मुंबईवर ग्रामीण शिक्का होता. पावसाळयात पार्ल्यातल्या विहिरी तुडुंब भरायच्या आणि पारध्यांच्या चित्र्यांच्या विहिरींवर पोहणा-या पोरांचा दंगा सुरु व्हायचा. मुटका मारुन पाणी उडवून काठावरच्या पोरांना भिजविणे हा अत्यंत आवडता खेळ होता.

‘कैवल्या’चा आनंद घेणारा! पु ल देशपांडे Kaivalyacha Anand Ghenara by Pu La Deshpande

श्री राम पुजारी यांच्या सत्तरीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ‘पुलं’नी आपल्या या स्नेह्य़ाचं रसिलं व्यक्तिमत्त्व शब्दांमधून उभं केलं होतं.‘पुलं’चं ते भाषण.
मित्रहो,
रामनं आपलं अंत:करण मोकळं करून भाषण केल्यानंतर, मी बोलणं मला चुकीचं वाटायला लागलेलं आहे. एखाद्या चांगल्या गाण्याचा परिणाम आपल्या मनावर व्हावा, तसा त्याच्या भाषणाचा परिणाम झालाय, गाणं संपल्यावर बोलणारे लोक किती कद्रू असतात ते माहीत असल्यामुळे, तो अपराध आपण करू नये असं मला वाटतं. पण आजचा प्रसंगच असा आहे की दोन शब्द आपल्या वतीनं मी बोललो नाही तर मलाच रुखरुख वाटत राहील. मी बोलू नये, अशी निसर्गानं व्यवस्था केलेली आहे पण दरवेळी निसर्गाचं मानलंच पाहिजे असं नाही.